बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि मुलाची हत्या करून पतीची आत्महत्या


पुणे- बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि एक वर्षाच्या मुलांची गळा चिरून हत्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे घडली आहे.दि. ९ मे रोजी सकाळी ११.०० ते ११.३० वा.च्या सुमारास ही घटना घडली.

हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय-३८ वर्षे) या तरुणाने कामधंदा नसल्याने बेरोजगारीला कंटाळून तसेच आर्थिक अडचणीच्या कारणावरून त्याची पत्नी सौ. प्रज्ञा हनुमंत शिंदे (वय-२८ वर्षे) व हिचा गळा दाबून व लहान मुलगा शिवतेज (वय-१ वर्षे २ महिने) याच्या गळ्यावर सुरीने कापून दोघांचाही खून केला. तसेच स्वतः बेडरूममधील पंख्याला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत त्याचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे (रा. प्रवीण काळभोर यांची इमारत, कदमवाकवस्ती, मूळ रा. बक्षिहिपरगा, सोलापूर) यांनी फिर्याद दिल्यावरून लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीची अकराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या

गुन्ह्याचा पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी करीत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love