सामाजिक कार्यकर्ते वसंतराव खरे यांचे दुःखद निधन


पुणे- पर्वती, पुणे भागात कार्यरत असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व बँक ऑफ महाराष्ट्रमधील निवृत्त कर्मचारी वसंतराव खरे ( वय  ७५ )यांचे आज १८ एप्रिल रोजी एका खाजगी रुग्णालयात पुणे येथे निधन झाले.

भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघाचे,महाबँक कला क्रीडा मंडळ व बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी क्रेडिट पतसंस्थेचे ते संस्थापक सदस्य, कार्यकर्ते,पदाधिकारी व मार्गदर्शक होते.ते उत्कृष्ठ गीत गायक होते.ग्राहक पेठ चे संचालक म्हणून पण काम पाहिले होते.

वसंतराव खरे यांनी महाराष्ट्र बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने स्व. मीनाताई ठाकरे नगर, मुकुंदनगर व महर्षींनगर भागातील गरीब झोपडपट्टी वस्तीतील वंचित मुले व मुलींसाठी गेल्या २५ वर्षापासून सातत्त्याने श्री संत नारायण गुरू अभ्यासिका व संस्कार वर्ग चालवीत असत. किशोरी विकास,मुलांसाठी संस्कार वर्ग,व्यायामशाळा,महिला बचतगट इ. विविध प्रकल्पाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजसेवा वसंतराव खरे यांनी केली.

अधिक वाचा  संविधान बदलणे किंवा रद्द करणे शक्य नाही-डॉ. मच्छिंद्र सकटे 

ह्या प्रकल्पाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.रज्जूभैय्या, मा.सुदर्शनजी यांनी  भेटी दिल्या होत्या. वस्तीतील लोकांसाठी वसंतराव खरे देवस्वरूप होते.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच महर्षींनगर भागातील  वस्तीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

त्यांच्या पश्चात पत्नी,व मुलगा होत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love