पुणे – हिंदूस्थानचे अराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून “रयतेच्या जनकल्याण राज्य व्यवस्थेची” स्थापना केली. त्याप्रमाणेच सत्ता पक्षाने, शिवाजी महाराजांना अपेक्षीत ‘रयते प्रती, महीला-भगींनींप्रती, सुरक्षा पुरवुन व बळीराजा शेतकऱ्यांप्रती त्यांच्या पिकास योग्य भाव देण्याचा व राजकीय उत्तरदायीत्वाचा कृतीशील राजधर्म निभवण्याची आज गरज आहे. तरच ते शिव छत्रपतींना खरोखरचे अभिवादन व खरी सुमनांजली ठरेल अशी अपेक्षा काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील शिव छत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हे राष्ट्रीय स्मारक व्हावे,अशी मागणीही तिवारी यांनी केली.
पुणे मेडीसीन असोसिएशन व डीलीव्हरी बॉईज यांच्या वतीने आयोजित “श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस” पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
तिवारी म्हणाले, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून “रयतेच्या जनकल्याण राज्य व्यवस्थेची” स्थापना केली त्याचा प्रत्यय शिवमुद्रेची प्रतीमा संविधानात प्रतिबिंबित होत असल्याने देशवासीयांना येतो. उत्तम राज्यकारभाराचा आदर्श जगासमोर ठेवणारे, प्रजाहितदक्ष व लोककल्याणकारी राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज होते. सत्ता पक्षाने, शिवाजी महाराजांना अपेक्षीत राजधर्म निभवण्याची आज गरज आहे.
या प्रसंगी संयोजक मा प्रसन्न पाटील, पप्पू शेठ गुजर, डॉ शैलेश गुजर, संजय अप्पा बिबवे, अनिल पाटोळे, भंडारे, दिवाकर जी, राठी साहेब, धनंजय भिलारे, गणेश शिंदे, अँड स्वप्नील जगताप इ सह मेडीसीन डीलीव्हरी बॉईज मोठ्या संख्येने उपस्थीत होते.