शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार?

शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार?
शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार?

पुणे(प्रतिनिधि)—मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी उपस्थित राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी मात्र अनुपस्थित राहात असल्याने ते पुन्हा शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यभर मेळावे घेताना दिसत आहे. आज अजित पवार यांचा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा सुरु आहे. या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसते ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे कोठेच दिसत नाहीत. अजित पवारांच्या मेळाव्याला पाठ फिरवणारे शिवाजीराव आढळराव पाटील हे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात. आढळराव पाटलांनी लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा पण ते आता अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या जास्त जवळ असल्याचे पहायला मिळते आहे.

अधिक वाचा  हडपसरमध्ये महायूतीत मिठाचा खडा : विकासकामाचे श्रेय लाटताना राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपला डावलल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकांच्या वेळी राजकीय तडजोड म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रामराम ठोकून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र लोकसभेला पराभवाचा झटका बसल्यानंतर आढळराव घरवापसी करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला गैरहजर राहिल्याने आढळराव नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे ते हातावरचं घड्याळ काढून मैत्रीपूर्वक धनुष्यबाण हाती घेण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. मात्र शिवाजीराव आढळराव पाटील या मेळाव्याला अनुपस्थित राहिले. त्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love