पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे येथे एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. दरम्यान, अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी काल शहा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. तेव्हा त्यांच्या पायगुणाने हे सरकार जावे आणि एक चांगले, कर्तबगार आणि लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे सरकार महाराष्ट्रात यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे बारामती दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नारायण राणे यांच्या या व्यक्तव्याची खिल्ली उडवली. नारायण राणे हे आमचे जने सहकारी आहेत. परंतु, ते विनोद करतात हे मला माहिती नव्हते. त्यांच्या व्यक्तव्याकडे विनोद म्हणून पहावे, त्या त्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे पवार म्हणाले.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, शेतकाऱ्यांशी एखाद्या वारिष्ट मंत्र्याने चर्चा करायला हवी. रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे आपले चांगले मित्र आहेत. ते शेतकऱ्यांशी चर्चा करताय. ते शेतीतज्ञ असल्याचे कळल्याने आपल्या ज्ञानात भर पडली आहे अशी कोपरखळी पवार यांनी लागावली.