संतोष मोरे यांची सहाय्यक आयुक्त वस्तू आणि सेवा कर या पदावर पदोन्नती

संतोष मोरे यांची सहाय्यक आयुक्त वस्तू आणि सेवा कर या पदावर पदोन्नती
संतोष मोरे यांची सहाय्यक आयुक्त वस्तू आणि सेवा कर या पदावर पदोन्नती

पुणे- कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवडचे विद्यमान अध्यक्ष संतोष कृष्णा मोरे यांची सहाय्यक आयुक्त वस्तू आणि सेवा कर (Assistant Commissioner – GST) या पदावर पदोन्नती झाली आहे. कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवडच्या सर्व पदाधिकारी, संपर्कप्रमुख, विभागीय अध्यक्ष आणि सर्व सभासद आणि समाज बांधव यांच्या वतीने मोरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

संतोष मोरे यांची पदोन्नती ही कोकणवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. खेड तालुक्यातील निगडे या छोट्या गावातून आलेले मोरे यांनी लिपिक ते सहाय्यक आयुक्त या उच्च पदापर्यंत गाठलेली ऊंची हा आम्हा सर्व कोकणवासीयांचा अभिमान आहे. आपल्या कोकणातील बोटावर मोजता येतील अशा लोकांपैकी ते आहेत हे त्यांच्या पदोन्नतीने सिद्ध झाले आहे अशा भावना यावेळी कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवडच्या सर्व पदाधिकारी, संपर्कप्रमुख, विभागीय अध्यक्ष आणि सर्व सभासद आणि समाज बांधव यांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  स्वार्थाच्या राजकारणामुळे विसरलेली जात पुन्हा वर येत आहे - चंद्रकांत पाटील