वाढीव पेंशन तत्काळ लागू करुन जेष्ठाचा आदर राखा-पंतप्रधान मोदींना शेतकरी महिलेचं पत्र

महाराष्ट्र
Spread the love

अहमदनगर– मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली तसेच मा.उच्च न्यायालय केरळ,हैद्राबाद, इंदौर,राजस्थान,मद्रास आदि न्यायालयाने दिलेले निकाल, भारत सरकारची हाय एम्पावर कमिटी, कोश्यारी कमिटी या सर्वानी ईपीएस 1995 च्या सर्व सेवानिवृत्त सदस्य यांना वाढिव पेंशनवाढ़ व त्यावर महागाई भत्ता लावणे विषयी शिफारस केलेली आहे. सदर शिफारसीसह वाढीव पेंशन तत्काळ लागू करुन जेष्ठाचा आदर राखावा असे आवाहन नेवासा येथील जेष्ठ प्रयोगशील शेतकरी महिला श्रीमती शशिकला मनोहर कुटे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुलाचे हस्ते मेल व रजिस्टर पत्राद्वारे केले आहे.

ईपीएस 1995 पेंशन अंतर्गत साखर कारखाने,एसटी महामंडळ,विजमंडळ आदीतिल सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक व त्यांच्या पत्नी असे जवळपास अंदाजे 70 लाखाचे आसपास नागरिक येतात.त्यांना अत्यंत कमी मासिक पेंशन केवळ 1000 ते जास्तीत जास्त 2500 च बसते .त्यामुळे या वयात या जेष्ठ नागरिकांना खुप हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

Epfo कार्यालयाकडे यांचेच जवळपास 5 लाख हजार कोटीच्या वर पीएफ फंड रक्कम जमा असूनही केवळ तुटपुंजी पेंशन रक्कम मिळत असल्याने सदस्य व त्यांची पत्नी यांना महागाईच्या काळात दैनंदिन जीवन जगने अवघड होत आहे. त्यात आलेले आजार,दवाखाना,मेडिकल,विजबिल,घरखर्च,घरभाड़े,गॅस,या सर्व बाबी तुटपुंज्या रक्कमेत भागवता येत नाही.

भारत देशास प्रगती पथावर नेण्यास या श्रमिक कामगार बांधवाचे खुप मोठे योगदान आहे. परंतु या वयात त्यांना सुख मिळायला हवे पण तेही यांचे नशीबी नाही, तुटपुंज्या पेंशनमुळे काहींची मूलही त्यांना सन्मानपूर्वक वागवत नाहीत व ज्याना मूल बाळ नाही त्यांची परस्थिति अतिशय बिकट आहे. वाढ़त्या वयात ,शुगर,बीपी,घुड़घे दुखने,शारीरिक आजारासह मानसिक ताप सहन करत लाजीरवाने जीवन जगावे लागत असून काहींना तर या वयात वेटर,वॉचमैन,ड्राइविंग,दुकानात काम करावे,लागत असल्याने या वयात ही संघर्ष साथ सोडतांना दिसत नाहीये.

मा.सर्वोच न्यायालय व मा.उच्च न्यायालय यांनीही वरील विषयी उचित न्याय देवूनही व आमच्या सारखे अनेक बांधवानी 35,40 वर्षे ईमाने प्रामाणिक नोकरी करुत प्रामाणिकपने मासिक वेतनातून इन्कम  टॅक्स व सर्व प्रकारचे शासकीय टॅक्सही वेळेत भरलेले असतांना आता आम्हां जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांना  तुटपुंज्या पेंशन मुळे हालअपेष्ठेत जीवन जगावे लागते ही अपल्या देशासाठी अतिशय लाजीरवानी बाब होय.

तरी आम्हां सर्व पेंशनर  व त्यांच्या पत्नी यांच्या वतीने केंद्रशाशनास विनंती करीत आहोत की 1) आम्हांस किमान 10 हजार मासिक पेंशन 2) वेळोवेळी दिला जाणारा महागाई भत्ता 3) पेंशनर सदस्य मुत्यु झाल्यास त्यांच्या पत्नीस ही 100 टक्के पेंशन मिळावी 4) आयुष्यमान भारत मेडिकल पॉलिसित समावेश करुन आम्हा जेष्ठांना सन्मापूर्वक जगु द्यावे असे या पत्रात आवाहन करण्यात आले आहे.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *