बोपदेव घाट रेप केस : आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस : आरोपींच्या शोधासाठी “सिंबा” या एआय तंत्रज्ञानाची पोलिस मदत घेणार

बोपदेव घाट रेप केस : आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस
बोपदेव घाट रेप केस : आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस

पुणे(प्रतिनिधि)— पुण्यातील बोपदेव घाटात  गुरुवारी आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी  केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपींचा अद्याप पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नाही. आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्यानंतर अद्याप कुठलाही सुगावा न लागल्याने आता या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी “सिंबा”ची (SIMBA) म्हणजेच ‘सिस्टीम फॉर इंटेलिजंट मॉनिटरिंग बिहेवियरियल एनालिसिस’ या एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

या एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती संकलित केली जाणार आहे. रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत नसल्याने संशयित आरोपींचे चेहरे पाहण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. “सिंबा’ चा मुख्य घटक, क्राइम जीपीटी  म्हणून ओळखला जातो. तो व्हिडिओ, इमेज आणि ऑडिओमधून माहिती काढण्यासाठी विस्तृत डेटाबेस वापरतो. “सिंबा” हे तंत्रज्ञान १.५ लाख गुन्हेगारी नोंदी असलेल्या डिजिटल डेटाबेसशी जोडले गेले आहे.

अधिक वाचा  सह्याद्रि हॉस्पिटल्सने सुरु केले आशियातील पहिले अत्याधुनिक रेडिओथेरपी उपचार : अत्यंत अचूकतेने कर्करोगाचा नाश करण्यात हे तंत्रज्ञान अधिक परिणामकारक

दरम्यान, बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाटामार्गे गेलेल्या मोबाइल वापरकर्ते, त्यांचे नाव, पत्ते याबाबतच्या माहितीचे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱयास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. आरोपींची माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधवा, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. पुण्यासह सोलापूर, तसेच सातारा जिल्हय़ातील सराईतांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी संकलित करण्यात आलेल्या माहितीचे एआय तंत्रज्ञानाच्या विश्लेषण करण्यात येणार आहे. बोपदेव घाटातील टेबल पॉईंट परिसरात महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला गुरुवारी मध्यरात्री मारहाण करण्यात आली. तरुणीवर आरोपींनी बलात्कार केला. आरोपींनी मारहाण करण्यासाठी वापरलेला बांबू आणि रक्त आढळून आले. पोलिसांनी रक्ताचे नमुने, बांबू, तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  ‘जीनोम टू ओम’ विज्ञानाकडून मेटासायन्सचे संक्रमण शोधतो : डॉ. भूषण पटवर्धन

पीडित तरुणी पुण्यातील बोपदेव घाटात गुरुवारी रात्री आपल्या मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी तीन जणांनी या दोघांवर हल्ला केला. हल्लेखोरांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवला. आरोपींनी तरुणाला मारहाण करून त्याचा शर्ट काढला आणि त्याच शर्टने आरोपींनी तरुणाचे हात बांधले. त्याच्याच पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय देखील बांधले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला एका झाडाला बांधून ठेवले. त्यांनतर २१  वर्षीय तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. नराधम आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती, तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love