पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास २५ मिनिटांनी सांगता

पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास २५ मिनिटांनी सांगता
पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास २५ मिनिटांनी सांगता

पुणे(प्रतिनिधि)— गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया..पुढच्या वर्षी लवकर या…चा जयघोष, ढोल-ताशांच्या निनाद, सुरेल सनई-चौघड्याचे वादन, डीजेच्या तालावर थीरकलेली तरुणाई अशा जल्लोषपूर्ण वातावरणात  पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची तब्बल २८ तास २५ मिनिटांनी सांगता झाली.

गणेश विसर्जन मिरवणूकीला मंगळवारी सकाळी १० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपती बाप्पाची आरती करून सुरुवात झाली.या नंतर ८ तासात मानाच्या पाचही गणेश मंडळाचे विसर्जन पूर्ण झाले तर यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत देखील आदर्श घालून देत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे अवघ्या ५ तासात विसर्जन झालं. रात्रीच्या वेळेस पुण्यातील विविध गणेश मंडळांना १० ते १२ तास लागले. रात्री बारानंतर डीजे बंद करण्यात आले आणि सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू करण्यात आले.पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर ढोल ताशा पथकांच्या गजरात विविध मंडळाचे विसर्जन सुरू होते.सकाळच्या सुमारास पोलिसांनी मंडळांना पुढे करत करत विसर्जन मिरवणूक सुरू ठेवली आणि तब्बल २८ तास २५ मिनिटांनी विसर्जन मिरवणूकीची सांगता झाली.

अधिक वाचा  94 वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार

२०१६ मध्ये विसर्जन मिरवणुकीला २८ तास ३० मिनिटे लागले  तर २०१७ मध्ये २८ तास ०५ मिनिटे  लागले. तसेच २०१८ मध्ये २७ तास १५ मिनिट तर २०१९ मध्ये  २४ तास तर २०२० आणि २०२१  कोविड महामारीमुळे मिरवणूक निघाली नाही. २०२२ मध्ये तब्बल ३१ तास मिरवणूक चालली तर २०२३ मध्ये २८ तास ४० मिनिटे मिरवणूक चालली.

नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई करणार – पोलिस आयुक्त

ज्या मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली आणि बंदी असतानाही लेजरचा मिरवणुकीत वापर केला अशा मंडळांवर कारवाई करणार असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

अमितेश कुमार म्हणाले, पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक २८ तास सुरू होती. पुण्यामध्ये ८ हजार अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात तैनात होते. शांततेत गणेशोत्सव पार पडला त्याबद्दल सर्व मंडळ आणि भक्तांना धन्यवाद. यंदाच्या वर्षी मिरणुकांमध्ये लेजरवर पूर्ण पणे बंदी होती. त्यासोबतच आवज मर्यादे संदर्भात देखील डेसीबील मोजण्याच्या मशीन होत्या. ज्या ठिकाणा या नियमांचे उल्लंघन केले गेले त्या ठिकाणी कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. : 31 हजार महिलांच्या मुखातून उमटले अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर

मोबाईल चोरी घटना घडल्या आहेत कमी घडल्या त्या सर्व बाबत कारवाई करून चोऱ्या उघडकीस आणू ,महिला सुरक्षा बाबत काम केलं त्यात काही घटना घडल्या असतील तर त्यावर ही कारवाई करणार असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love