पुणे पीपल्स को ऑप. बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा टप्पा केला पार


पुणे : मागील चार  वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल, नोटबंदी, त्यानंतर बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी व एकूणच उद्योग व्यवसायात आलेल्या अडचणी तसेच जागतिक अस्थिरतेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर  झालेले परिणाम या सगळ्या अडचणींच्या काळात सुध्दा पुणे पीपल्स को ऑप. बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२०-२०२१ आर्थिक वर्षात बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा टप्पा पार केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए जर्नादन रणदिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बँकेचे उपाध्यक्ष डॉ.रमेश सोनवणे, संचालक अ‍ॅड.सुभाष मोहिते, मिलींद वाणी, प्रभारी सरव्यवस्थापक संजय जगताप यांसह संचालक यावेळी उपस्थित होते.  

 जर्नादन रणदिवे म्हणाले, ठेवींच्या व्याज दरात मोठया प्रमाणात घसरण झाल्यावर सुद्धा इतर बँकांच्या तुलनेत पुणे पीपल्स को आॅप बँकेच्या ठेवींमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. कर्ज व्याज दरामध्ये असलेली तीव्र स्पर्धा इतकी जीवघेणी आहे कि चांगले कर्जदार टिकवणे खूपच कठीण आहे. परंतु अश्याही परिस्थितीत बँकेने कर्जदारांना चांगली सेवा व आकर्षक व्याज दर  देऊन कर्जवाटपामध्ये वाढ केलेली आहे.

अधिक वाचा  अर्थसंकल्पातून रोजगारनिर्मितीला चालना:बांधकामासह विविध क्षेत्रांतून अनुकूल प्रतिक्रिया

रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना त्यांच्या एकूण कर्जाच्या ५०% कर्जही रु. २५ लाखाचे आत ठेवण्याचे बंधन टाकले आहे. परंतु अडचणीच्या काळातही पुणे पीपल्स को ऑप. बँकेने त्याचे प्रमाण ५०% राहील याची काळजी घेतली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचने नुसार बँकांचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण हे ९% चे वर असणे आवश्यक असतानां बँकेचे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण हे मागील कित्येक वर्ष १२% च्या पुढे राखले आहे आणि हि खूप मोठी बाब आहे. इतर बँकांचा एकूण व्यवसाय कमी होत असताना पुणे पीपल्स को ऑप. बँकेने अडचणीच्या काळातील उल्लेखनीय कामगिरी पुढील काळात मोठी कामगिरी करायला उद्युक्त करते, असे त्यांनी सांगितले.

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचने नुसार बँकांचे नेट एनपीए चे प्रमाण ६% चे आत आवश्यक असताना पुणे पीपल्स को ऑप. बँकेने मागील तीन  वर्ष हे प्रमाण ३% च्या आत राखले आहे. चालू आर्थिक वर्षात पुणे पीपल्स को ऑप. बँकेचे नेट एनपीए चे प्रमाण हे ०% असेल या बाबत आम्हाला खात्री आहे. इतर बँकांचे ढोबळ एनपीए चे प्रमाण हे १०% चे वर असताना पुणे पीपल्स को ऑप. बँकेने सदरचे प्रमाण ८% राखण्यात यश मिळवले आहे. इतर बँकांचे तुलनेत पुणे पीपल्स को ऑप. बँकेची सेवक उत्पादकता (इतर बँकांची सरासरी ६ ते ८ कोटी ) जास्त असून मार्च २१ ला ते प्रमाण ९ कोटी असेल असं त्यांनी स्पष्ट केले.   

अधिक वाचा  एक सप्टेंबर पासून देशात होणार हे बदल

३१ मार्च २०२१ चे बँकेचे उद्दिष्टय  :-

बँकेचा एकूण व्यवसाय रु. २००० कोटी पेक्षा जास्त

ठेवी रु. १२५० कोटी

कर्ज रु. ८०० कोटी

भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण १२% पेक्षा जास्त

निव्वळ नफा रु. १५ कोटी पेक्षा जास्त

ढोबळ एनपीए चे प्रमाण ६% चे खाली

नेट एनपीए चे प्रमाण ०% चे खाली

मागील आर्थिक वर्षात पुणे पीपल्स को आॅप बँकेने मिळवलेल्या नफ्यातून १२% लाभांश देणेबाबत रिझर्व्ह बँकेला परवानगी मागितली होती. परंतु रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचने नुसार कोविड च्या पार्श्वभूमीवर बँकांना लाभांश देण्यास मनाई केली आहे. परंतु चालू आर्थिक वषार्ची बँकेची प्रगती बघता व रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली तर पुढील वर्षी पुणे पीपल्स को आॅप बँक कमीत कमी १२% लाभांश देऊ शकेल. पुणे पीपल्स को आॅप बँकेचे रिजर्व फंड खूप चांगले असून बँकेचे नेट वर्थ जवळपास १०० कोटी आहे.

अधिक वाचा  सहकारी बँकांच्या संचालकपदी दोनपेक्षा जास्त मुदतीसाठी राहता येणार नाही - सतीश मराठे

चालू वर्षात  कोविड मुळे सहा ते सात महिने उद्योग व्यवसाय बंद असल्यामुळे कोणत्याही बँकेला व्यवसायात वाढ करता आलेली नाही, या काळात सुध्दा पुणे पीपल्स को ऑप. बँकेने उल्लेखनीय कामगिरी पार पडली आहे. या सगळ्याचा अर्थ पुणे पीपल्स को ऑप.बँक अतिशय भक्कम पणे चांगल्या उद्दिष्टाकडे वाटचाल करीत आहे. आम्हा सर्व संचालक मंडळाला विश्वास आहे की, वरील उद्दिष्टे गाठण्यात संचालक मंडळ व सेवकांच्या सामुदायिक प्रयत्नामुळे व सभासद ठेवीदार यांच्या सहकार्याने कोणतीही अडचण येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love