लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश : धबधब्यात उतरण्यास, धोकादायक ठिकाणी सेल्फीस मनाई

लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांवर 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

पुणे(प्रतिनिधी)– पावसाळा सुरू होताच पर्यटकांचा ओघ वाढला असून, लोणावळा (Lonavala) व परिसरातील पर्यटनस्थळांवर वाढलेल्या गर्दीमुळे अपघात, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi – District Collector) यांनी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशात पुणे जिह्यातील लोणावळा (Lonavala) परिसरातील एकवीरा देवी (Ekvira Devi), कार्ला लेणी (Karla Caves), भाजे लेणी (Bhaje Caves), भाजे धबधबा (Bhaje Waterfall), लोहगड (Lohagad Fort), विसापूर (Visapur Fort), तिकोणा किल्ला (Tikona Fort), टायगर पॉईंट (Tiger Point), लायन्स पॉईंट (Lion’s Point), शिवलिंग पॉईंट (Shivling Point), पवना धरण (Pawna Dam) या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. त्यानुसार धबधब्यावर किंवा वेगाने वाहणाऱया पाण्यात उतरून पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा चित्रीकरण करू नये, नैसर्गिक धबधब्यांजवळ मद्यपान, अनधिकृत मद्यविक्री किंवा मद्य सेवनास बंदी, सार्वजनिक ठिकाणी कचरा, प्लास्टिक वस्तू किंवा बाटल्या टाकण्यास मनाई, सार्वजनिक ठिकाणी महिलांशी असभ्य वर्तन किंवा छेडछाड केल्यास कठोर कारवाई, मोठ्या आवाजात गाणी, डीजे वाजविणे आणि ध्वनी प्रदूषणास मनाई, धबधबे, धरण परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी (आवश्यक सेवेतील वाहन वगळून), रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने गाड्या पार्क करणे किंवा बेदरकार वाहन चालवणे निषिद्ध आहे. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण (Pune Rural Police) यांच्या शिफारसीनंतर हे आदेश लागू करण्यात आले असून, त्याचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ (Bharatiya Nyaya Sanhita 2023) च्या कलम २२३ अंतर्गत शिक्षेस पात्र ठरणार आहे.

अधिक वाचा  शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यसरकार देणार ५० कोटी रुपयांचा निधी : देवेंद्र फडणवीस

दरम्यान, पावसाळा सुरू होताच लोणावळा (Lonavala) आणि परिसरातील एकविरा देवी (Ekvira Devi), भाजे लेणी (Bhaje Caves), लोहगड (Lohagad Fort), विसापूर (Visapur Fort), टायगर पॉईंट (Tiger Point), पवना डॅम (Pawna Dam) यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे होणाऱया वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) व जिल्हा प्रशासनाने वाहतूक मार्गात महत्त्वपूर्ण बदल करत पर्यायी मार्गांची घोषणा केली आहे. हे बदल ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत लागू असणार आहेत. त्यानुसार भाजे गाव (Bhaje Village) कडून मळवली-कार्ला मार्ग (Malavli-Karla Road) बंद असेल. तर पर्यायी मार्ग पाटण ब्रिजा देवला औंढे ब्रिजा कुसगावा लोणावळा जुना हायवे/एक्सप्रेस वे (Patan Bridge Devla Aundhe Bridge Kusgaon Lonavala Old Highway/Expressway) असा असेल. तर भाजे ते लोहगड मार्ग (Bhaje to Lohagad Road) वन वे करण्यात आला आहे. फक्त भाजे (Bhaje) येथून लोहगडाकडे (Lohagad) जाणाऱया वाहनांना परवानगी असेल. लोहगडहून (Lohagad) बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग सुचवले आहेत. चारचाकीसाठी लोहगडा दुधिवरे खिंडा औंढोला औंढा कुसगावा लोणावळा (Lohagad Dudhivare Khinda Aundhola Aundha Kusgaon Lonavala) असा मार्ग देण्यात आला आहे. दुचाकी/तीनचाकीसाठी वरील मार्ग किंवा पवनानगरमार्गे (Pawananagar) हायवेचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. तर कार्ला फाटा ते वेहेरगाव (Karla Phata to Vehergaon) या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहील. मात्र, हे सर्व निर्बंध स्थानिक रहिवाशांसाठी लागू राहणार नाहीत, असे कळवण्यात आले आहे.

अधिक वाचा  मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे पिंपरीत नवीन विक्री दालन
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love