दहावी, बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
दहावी, बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे(प्रतिनिधी)– राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱया इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून, यंदा प्रथमच दोन्ही परीक्षा नियोजित तारखेपेक्षा 8 ते 10 दिवस अगोदर होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते  18 मार्च 2025 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने राज्य मंडळाकडून दरवषी परीक्षेच्या तारखा 5 ते 6 महिने अगोदर जाहीर केल्या जातात. त्यानुसार फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये आयोजित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया वेळेत होण्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तयारीला विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी यंदापासून दोन्ही परीक्षा 8-10 दिवस लवकर होत आहेत. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. 24 जानेवारी ते दि. 10 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

अधिक वाचा  महायूतीचे हे 9 बडे नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत ?

दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. 3  ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षेच्या सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. या संभाव्य वेळापत्रकावर सूचना, हरकती मांडण्यासाठी 23 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर या सूचना पाठवायच्या आहेत. निर्धारित वेळेनंतर येणाऱया सूचनांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love