पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला : कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ
पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ

पुणे(प्रतिनिधि)–प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हीची युपीएससीने उमेदवारी रद्द केल्यानंतर पूजा खेडकर हिचा दिल्लीतील पटियाला न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे पूजा खेडकर हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पूजाने अटक टाळण्यासाठी धावाधाव करण्यास सुरुवात केली असून तिने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात  झाली होती. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज (गुरुवार) जाहीर करण्यात आला. पूजा यांच्या वकीलांनी त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जोरदार युक्तिवाद केला. पूजा हिने कोणतीही फसवणूक केलेली नाही, पूजाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अयोग्य कसे ठरते? पूजा महिला असल्याने तिला त्रास दिला जात असल्याचे पूजाच्या वकिलांनी म्हटले होते. सरकारी वकिलांनी या प्रकरणात बऱ्याच बाबींची चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. पूजाने किती वेळा नाव बदलून परीक्षा दिल्या यासह अनेक बाबींची चौकशी होण्याची गरज असल्याचे सरकारी वकिलांनी तसेच युपीएससीच्या वकिलांनी म्हटले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी सदर प्रकरणाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते.

अधिक वाचा  राज्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे- पंकजा मुंडे

युपीएससीने बुधवारी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिच्याविरोधात कारवाई केली होती. नागरी सेवा परीक्षा २०२२  चे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजाची उमेदवारी तात्पुरती रद्द करण्यात आली. पूजा हिला भविष्यात युपीएससीची परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली असून निवडीवरही बंदी घालण्यात आली आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या माहितीनुसार पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिने ओळख लपवून युपीएससीची परीक्षा दिली. परीक्षेसाठी असलेल्या प्रयत्नांची मर्यादा पूजाने विविध पळवाटा काढून बेकायदेशीररित्या ओलांडल्याचेही युपीएससीने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात युपीएससीने पूजा खेडकर हिला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. २५ जुलै पर्यंत आपले म्हणणे मांडण्यास पूजाला सांगण्यात आले होते मात्र पूजाने ४ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. पूजाची मागणी अमान्य केली मात्र उत्तर सादर करण्याची मुदत २५ ऐवजी ३० जुलै करण्यात आली होती. उत्तर सादर करण्यासाठीची ही शेवटची संधी असल्याचेही म्हटले होते. मुदतीत प्रतिसाद न दिल्यास कारवाई करण्यात येईल असे पूजाला स्पष्टपणे सांगण्यात आले होते.

अधिक वाचा  चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता : अश्विनी जगताप हाती तुतारी घेणार?

दरम्यान, पूजा खेडकरांची बाजू अ‍ॅड. माधवन यांनी मांडली. त्यांनी म्हटले की, पूजाविरोधात जी कलमे लावली आहे त्यानुसार त्यांना अटक होण्याचा धोका आहे. पूजाने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. तिच्यावर नाव बदलण्याचा आरोप आहे. मात्र तिने नाव बदलल्याचे गॅझेट काढले आहे. खोटे अपंगत्व प्रमाणपत्र घेतल्याच्या आरोपावर युक्तिवाद करताना पूजाच्या वकिलांनी म्हटले की, पूजा यांना दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे एका डॉक्टराने दिलेले नाही तर आठ डॉक्टरांनी दिले आहे. हे प्रमाणपत्र एम्स बोर्डाकडून देण्यात आल्याचेही पूजाच्या वकिलांनी म्हटले आहे. या प्रमाणपत्राची मूळ प्रत युपीएससीकडे सादर करण्यात आली असल्याने ही फसवणूक कशी ठरते असा सवाल पूजाच्या वकिलांनी विचारला आहे.

सरकारी वकील अ‍ॅड. श्रीवास्तव यांनी युक्तिवाद करताना म्हणाले, पूजा खेडकर यांनी बनावटगिरी आणि फसवणूक केली आहे. पूजा यांनी अशी माहिती लपवली की ज्यामुळे तिला परीक्षेला बसण्यापासून वंचित केले गेले असते. पूजाने वारंवार आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळेच तिची चौकशीची गरज आहे. त्यामुळे कोठडी द्यावी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. पूजा यांना जर अटकपूर्व जामीन दिला तर ती चौकशीत सहकार्य करणार नाही असेही सरकारी वकीलांनी म्हटले. पूजा खेडकर हिला आपण बनावट कागदपत्र बनवली असून त्या आधारे युपीएससीची परीक्षा दिल्याचे माहिती गोते. पूर्ण शुद्धीत असताना त्यांनी हे कृत्य केले आहे. ⁠यूपीएससीच्या नियमावलीत हे स्पष्टपणे लिहिले आहे की, जर तुम्ही बनावट कागदपत्रे सादर केली तर तुमची उमेदवारी रद्द होईल तसेच तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे गुन्हा दाखल होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण पाहाता त्यांना अटकपूर्व जामीन देवू नये.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love