राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे; ती वाढवणे हे एक मोठे आव्हान : जयंत पाटील यांचे मत

राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे
राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे

पुणे(प्रतिनिधी)- सामाजिक, धार्मिक एकोपा आणि कायदा सुव्यवस्थेच्या अभाव, हे आजघडीला महाराष्ट्रासमोरील प्रमुख आव्हान आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली असून, ती वाढवणे, हेही एक मोठे आव्हान असल्याचे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्हिजन 2050′ या व्याख्यानात ते बोलत होते. पाटील म्हणाले, राज्यातील वातावरण बदलत आहे. प्रक्षोभक आणि द्वेष पसरविणारी वक्तव्ये आता सर्रास केली जातात. पोलीस यंत्रणा ते रोखू शकत नाही. शालेय संस्कार महत्त्वाचे असून, धर्मनिरपेक्ष पिढी निर्माण व्हायला पाहिजे. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. सर्वधर्म समभावाची भावना दिसून येत नाही. हे चिंताजनक आहे.

अधिक वाचा  चंद्रकांत पाटील म्हणतात तिसरा मंत्री लवकरच राजीनामा देणार:तो मंत्री कोण?

आम्ही राजकारणी लोक आम्हाला मते कसे मिळतील, याचाच विचार करतो. जनतेने याबाबतीत जबाबदारी घेऊन भूमिका घेणे आवश्यक आहे. तात्पुरत्या प्रलोभापेक्षा दूरदर्शी विकासाचा विचार जनतेने करायला हवा. राजकीय भ्रष्टाचार हे आव्हान आहे. राजकीय नेत्यांनी स्वतःची विश्वासार्हता पुरती गमावली आहे. ती वाढवणे हेही एक मोठे आव्हान आहे. राज्यात दोन घटना घडल्या, तेव्हापासून राजकीय पक्षांची विश्वासार्हता संपुष्टात आली असून, निवडणूक आयोगाचा कणाहीनपणाही अधोरेखित झाला आहे. यातून जनमानसाचा यंत्रणांवरचा विश्वास उडत असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

शरद पवार यांची भूमिका त्यागाचीच राहिली आहे. महाविकास आघाडी एकसंध राहायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आमचा मुख्यमंत्री व्हावा, असे लोकांना वाटते, असे सांगत सांगलीच्या विषयावर पांघरून पडले आहे. ते आता उकरून काढण्याची गरज नाही. सांगलीतील दोन्ही तरुण मुले चांगली आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केले आहे. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यावेळी गैरसमज झाले होते. आता दुरुस्ती झालेली आहे. सांगलीत कोणी कुणाचा कार्यक्रम केला नाही. परिस्थितीच तशी निर्माण झाली, असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  दहा महिन्यानंतरही पंतप्रधानांनी दखल न घेणं हा जनतेचा अपमान - गोपाळदादा तिवारी

पक्ष कसा चालला पाहिजे. याचा सर्वात जास्त अनुभव मला आहे. माझे दिवस मोजणाऱयांना ते कळून चुकले असेल, असे सांगत फडणवीस यांच्या मनात काय आहे, हे अमित शहा यांना कळत नाही आणि फडणवीस यांना कळत नाही की अमित शहा यांच्या मनात काय आहे. त्यामुळं दोघांमध्ये अंतर निर्माण झाले. आहे. फडणवीस यांना महाराष्ट्रात सध्या नीट काम करता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

पवार साहेबांनी लालबागच्या गणपतीचे दर्शन घेतले. मात्र, त्यावर विनाकारण टीका करून भाजप शरद पवार यांना प्रसिद्धी देत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love