प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड जिल्हा होणे आवश्यक : आमदार प्रसाद लाड

Pimpri-Chinchwad district should be made in terms of administrative work
Pimpri-Chinchwad district should be made in terms of administrative work

पिंपरी(प्रतिनिधी)–पुण्याएवढाच पिंपरी-चिंचवडचाही विस्तार झालेला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड जिल्हा होणे आवश्यक बनले आहे. पिंपरी चिंचवडच्या विकासात माजी महापौर नानासाहेब शितोळे यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन आमदार प्रसाद लाड यांनी केले. दरम्यान, रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जुनी सांगवी येथे माजी महापौर स्व. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या १० व्या स्मृति दिनानिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या आवारात आयोजित रोजगार मेळाव्याचे उदघाट्न आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व स्व. नानासाहेब शितोळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. रोजगार मेळाव्यातील उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करताना आमदार लाड बोलत होते. यावेळी अनिता शितोळे, उद्योजिका नीता लाड, उद्योजक अजय शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, सचिव प्रणव राव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडीचे प्राचार्य शशिकांत पाटील, अधिराज शितोळे, बाळासाहेब शितोळे, शिवराज शितोळे, संतोष शितोळे, भटू शिंदे, तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, पश्चिम ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी, कृष्णाई भजनी मंडळाचे सदस्य, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  महाविकास आघाडी सरकार 'हम करेसो कायदा' सारखं वागते आहे-चंद्रकांत पाटील

आमदार लाड म्हणाले, की शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद आपल्यात असते. फक्त ती ताकद आपण ओळखून त्या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे. व्यक्तीमध्ये काम करण्याची हिंमत असेल, तर परिस्थिती बदलू शकते. माणसांनी नेहमी स्वप्न बघितली पाहिजे आणि ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगवीचा विकास करण्यात नानासाहेब शितोळे यांचा मोठा हातभार आहे. पर्यायाने पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांना सुखसुविधा मिळून त्यांचे जीवन सुकर व्हावे, असे त्यांना नेहमी वाटे. शहरात चांगले दवाखाने, प्रशस्त रस्ते त्यांच्याच महापौरपदाच्या तयार झाले. विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे होते. जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च केला पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता, असेही आमदार लाड यांनी सांगितले.

प्रास्ताविक आरती राव यांनी केले. प्राचार्य शशिकांत पाटील यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन स्मिता बर्गे यांनी, तर आभार स्वाती तोडकर  यांनी मानले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love