PCMC Election : PCMC आरक्षण सोडत: विधानसभा उपाध्यक्षांच्या मुलाला थेट ‘नो-एंट्री’; सावळे, कामठे यांच्यासह अनेक दिग्गजांना धक्का

PCMC Election
PCMC Election

PCMC Election : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ३२ प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. यात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे ज्या दोन प्रभागातून तयारी करत होता. तिथे महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे . यामुळे आता अन्य प्रभागाचा विचार आमदार बनसोडेना करावा लागणार आहे. यासोबतच भाजपच्या सत्तेतील पहिल्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, पिंपरी विधानसभेची निवडणूक शरद पवारांच्या तिकिटावर लढलेल्या सुलक्षणा शिलवंत यांना ही धक्का बसला आहे. यांसह अन्य माजी नगरसेवकांना इतर प्रभागातून चाचपणी करावी लागणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रिया  आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाली. राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियंत्रणाखाली सदर आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर,  यांच्यासह महापालिकेचे  मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे,सह आयुक्त मनोज लोणकर, सहायक नगर रचनाकार प्रशांत शिंपी उपस्थित होते. निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सुरूवातीला राज्य निवडणूक आयोगाची आरक्षण सोडतीसाठी असणारी नियमावली सांगितली. त्यानंतर निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया चार टप्प्यात संपन्न झाली.
यामध्ये पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांकरिता राखीव असणाऱ्या जागांसाठी सोडत शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलांकरिता राखीव असणाऱ्या जागांसाठी सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडत प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग सोडत प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्याकरिता प्रक्रिया पूर्ण करून प्रभागनिहाय आरक्षित जागा जाहीर करण्यात आल्या.
———————–
मंगळवारी जाहीर झालेया  या सोडती मध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. सीमा सावळे, आशा शेडगे, तुषार कामठे, मयूर कलाटे, शाम लांडे, सुलक्षण शिलवंत धर यांच्या सह अनेक दिग्गजांना अपेक्षित आरक्षण पडले नाही. झालेल्या या सोडत कार्यक्रमांनुसार दिग्ग्जनाना बांधलेला प्रभाग सोडून इतरत्र धावाधाव करावी लागणार आहे.
————————
अशी आहेत आरक्षणे
प्रभाग क्रमांक: १
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: २
अ) ओबीसी महिला
ब) महिला सर्वसाधारण
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ३
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ४
अ) महिला अनुसुचित जाती
ब) अनुसुचित जमाती
क) महिला ओबीसी
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ५
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ६
अ) महिला ओबीसी
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: ७
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ८
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: ९
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १०
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ११
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १२
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १३
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १४
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १५
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १६
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १७
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: १८
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक: १९
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) अ राखीव
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक:  २०
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक: २१
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २२
अ) महिला ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) अ राखीव
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २३
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २४
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २५
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २६
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अराखीव
प्रभाग क्रमांक : २७
अ) अनुसुचित जाती
ब) महिला ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २८
अ) ओबीसी
ब) महिला सर्वसाधारण
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : २९
अ) महिला अनुसुचित जाती
ब) महिला अनुसुचित जमाती
क) ओबीसी
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ३०
अ) अनुसुचित जाती
ब) महिला अनुसुचित जाती
क) ओबीसी
ड) महिला सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक : ३१
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
प्रभाग क्रमांक : ३२
अ) महिला अनुसुचित जाती
ब) ओबीसी
क) महिला सर्वसाधारण
ड) अ राखीव
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  आम्ही सावित्री - फातीमेच्या लेकी, काय आम्हा कुणाची भीती : हिजाब बंदीचा वाद- कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन