नवी दिल्ली – एका गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तानच्या लष्कराने भारतामध्ये अंतर्गत फूट पाडण्यासाठी एक मोठे ‘डिजिटल’ षड्यंत्र रचले आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, पाकिस्तानी लष्कराने ३०० तज्ञांची एक विशेष सोशल मीडिया टीम तयार केली आहे.
या पथकातील सर्व सदस्य भारतीय भाषांमध्ये पारंगत आहेत आणि त्यांना मासिक वेतनावर नेमण्यात आले आहे. या संघाचे मुख्य उद्दीष्ट्य भारतातील हिंदू समाजात भाषा आणि जातीच्या आधारावर मतभेद निर्माण करणे आहे. या धोकादायक कटाचे नेतृत्व पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI चे एक माजी अधिकारी, कर्नल हाफीजुल्लाह करत आहेत.
भारतीय पोलीस दलातील निवृत्त अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी यांनी नुकतीच ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. एका गुप्तचर अहवालाचा हवाला देत त्यांनी पाकिस्तानच्या एका मोठ्या ‘डिजिटल’ षड्यंत्राचा पर्दाफाश केला आहे, ज्याचा उद्देश भारतात अंतर्गत फूट पाडणे हा आहे.
या षड्यंत्राचा भाग म्हणून, भविष्यात तुम्हाला अशा अनेक पोस्ट्स किंवा संदेश दिसू शकतात, जे हिंदू समाजात जाती आणि भाषेच्या नावावर शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न करतील. अशा पोस्ट्सपासून सावध राहण्याचे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न देण्याचे आवाहन त्यांनी केले आले आहे. उलट, अशा वापरकर्त्यांना तात्काळ ब्लॉक करून शत्रूचा कट हाणून पाडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याची जबाबदारी केवळ सैनिकांची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. सीमेवर लढल्याशिवायही तुम्ही या जबाबदारीची पूर्तता करू शकता, असे आवाहन करण्यात आले आहे. हे एक अदृश्य युद्ध आहे, जे आपण आणि तुम्ही एकत्र जिंकू शकतो. त्यामुळे, राष्ट्रीय सुरक्षा आणि सलोख्याच्या हितासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या डिजिटल युद्धाला हरवण्यासाठी नागरिकांनी खालील गोष्टी कराव्यात:
जाती-धर्मावर आधारित वाद वाढवणाऱ्या पोस्ट्सना प्रतिसाद देऊ नका.
अशा वापरकर्त्यांना तात्काळ ब्लॉक करा.
देशाची एकता टिकवण्यासाठी सक्रिय योगदान द्या.
ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शत्रूचा कट उघड होईल.
हे केवळ एका देशाचे आव्हान नाही, तर एक सामाजिक जबाबदारी आहे, जी आपल्या सर्वांना मिळून पार पाडायची आहे, असेही आवाहन करण्यात आले आहे.