पुणे – जिल्हा परिषदेच्या वतिने दौंड येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा धनुर्विद्या स्पर्धा अतिशय रोमांचकारी झाली. या स्पर्धेत अंडर-१९ मुलींमधे ध्रुव ग्लोबल स्कूलची निरवा पटेल हिने निशाण्यावर अचूक बाण सोडत २५६ पॉइंट मिळवून प्रथम क्रमांकासह सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर त्रिशा सावंत हिला रौप्य पदक वर समाधान मानावे लागले.
अंडर-१४ मुलांमध्ये मलंक मिश्रा याने २६५ पॉइंट मिळवून सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. तर ध्रुव लांडगे यांला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
येथे झालेल्या स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने पालकच नव्हे तर हितचिंतकही खूश आहेत. या खेळाडूंना सुरूवातीपासूनच तिरंदाजीची आवड होती. खेळात त्यांनी आपले कौशल्य दाखवून शाळेला बहुमान मिळवून दिला.
या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक केले. प्रशिक्षक मयंक गोडसे यांनी मार्गदर्शन केले.