निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार- सुषमा अंधारे

निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार

पुणे(प्रतिनिधि)–नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने अत्यंत बेताल वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षांना खुश करुन राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील, तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र, त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी  ठाकरेंच्या गटात दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा आरोप केला. या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झाले आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत  नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने बेताल वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.

अधिक वाचा  जालण्यातून दानवेंना पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही:जावई हर्षवर्धन जाधव यांचं खुलं आव्हान

अंधारे म्हणाल्या, प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळख आहे. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केले आहे. ईमानदारी हा शब्दच नीलम गोऱ्हे यांच्या शब्द कोशात नाही. आधी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बेइमानी केली. त्यानंतर शरद पवार यांच्याशी बेइमानी केली. नंतर त्या आमच्या पक्षात आल्या. नीलम गोऱ्हे यांनी एकही नगरसेवक निवडणून आणता आला नाही.पक्ष संघटना वाढवली नाही.शिवसैनिकाला हिडीस वागणूक दिली. २०१७ साली त्यांनी माझा पक्ष प्रवेश होऊ दिला नाही, असा आरोप त्यांनी केला.

अधिक वाचा  गिरीश बापट आणि संजय काकडे प्रचारात सक्रिय : देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश : नाकात ऑक्सीजनची नळी आणि थरथरते हात अशा अवस्थेत बापटांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नीलम गोऱ्हेंना साहित्य संमेलनात बोलवण्यागची अगतिकता काय होती? त्यांनी शिवसेनेवर चिखलफेक केली. पक्ष आणि पक्षप्रमुख यांची बदनामी केली, म्हणून त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. नीलम गोऱ्हे यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जावं. कर्तृत्व नसताना त्यांनी निष्ठावान लोकांची पदे अडवली. त्यांनी नाक घासून माफी मागितली तरी आमचा लढा सुरूच राहणार असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, इतर पक्ष गोऱ्हे यांच्यावर का बोलत नाहीत? या प्रश्नाला उत्तर देताना अंधारे म्हणाल्या.मला अपेक्षा नाही की कोणी त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी किंवा नाही द्यावी. राष्ट्रवादी, काँग्रेस काय बोलते याची वाट बघणार्यांपैकी आम्ही नाही. ज्यांना त्याच्यासोबत मंच शेअर करायचे आहेत, त्यांचा पाहुणचार, स्तुती सुमने करायची आहेत ते करू देत आमची लढाई लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

अधिक वाचा  राहुल गांधी यांनी परभणीला भेट देऊन त्यांचं विद्वेषाचे काम पूर्ण केलेलं आहे- देवेंद्र फडणवीस यांची टीका

राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत. हे कौटुंबिक नातं आहे. त्यामुळे कितीही वेळा एकत्र येऊ शकतात. ते ३ नाही ३३ वेळा भेटू देत त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत व्यक्त केली.

 

 

 

 

 

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love