एनडीए करणार ३५० पार : अमित शाह,नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी :ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकीत

NDA will do 350 par
NDA will do 350 par

पुणे – लोकसभा 2024 निवडणुकीच्या मतदान व निकालाच्या वेळेचे ग्रहमान एनडीए आघाडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनुकूल असल्यामुळे एनडीए आघाडी ला ३५० हून अधिक  जागा मिळून नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तर अमित शाह,नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी आहे,असे भाकीत पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तविले आहे.काँग्रेस पक्षाला ६० ते ८० जागा मिळण्याची शक्यता असून इंडिया आघाडीला १६० ते १८० जागा मिळण्याची शक्यता राहील असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

महाराष्ट्रात महायुतीला मागील वेळेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता असून २८ ते ३१ जागा महायुतीला व महाविकास आघाडीला १७ ते २० जागा मिळण्याची शक्यता राहिल,निवडणुकी नंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल संभवतात .देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता असून भाजप चे महाराष्ट्रातील नेतृत्व बदलण्याची शक्यता राहिल .उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या लोकसभेतील सध्याच्या जागा कायम राहतील तर भाजप व शिवसेना(शिंदे गट)यांच्या काही जागा कमी होण्याची शक्यता वाटते,असे सिद्धेश्वर मारटकर यांनी आज सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अधिक वाचा  अबब! दिवसभरात कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी पुढील काळात वाढण्याची शक्यता असून पुढील काळात मोठ्या राजकीय व्यक्तीना तुरुंगवास होण्याची शक्यता राहील.महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुढील विधानसभा निवडणुकी पर्यंत गोंधळाचे राहणार असून लोकसभा निवडणुकीनंतर पक्षांतराच्या  घटना मोठ्या प्रमाणावर होतील,असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे. मारटकर यांची अनेक राजकीय भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत. लोकसभा निकाल जवळ आल्याने त्यांनी आपले भाकीत प्रसिद्धीस दिले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love