हडपसरमध्ये महायूतीत मिठाचा खडा : विकासकामाचे श्रेय लाटताना राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपला डावलल्याचा आरोप

हडपसरमध्ये महायूतीत मिठाचा खडा ; विकासकामाचे श्रेय लाटताना राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपला डावलल्याचा आरोप
हडपसरमध्ये महायूतीत मिठाचा खडा ; विकासकामाचे श्रेय लाटताना राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपला डावलल्याचा आरोप

पुणे(प्रतिनिधि)–भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी केल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून आंदोलन केले.  महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुती मध्ये मात्र मिठाचा खडा पडला आहे. आंदोलकांनी पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे सांगितले.

हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला असताना विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत आहेत असा आरोप शिवराज घुले यांना यावेळी केला.

अधिक वाचा  हा राज्यातील शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय - देवेंद्र फडणवीस

या आंदोलन प्रसंगी माजी सरपंच शिवराज घुले, नगरसेवक बाळासाहेब घुले,  युवा मोर्चा अध्यक्ष सुमित घुले, सरचिटणीस समीर घुले, छायाताई गदादे, ओबीसी अध्यक्ष मयूर झगडे, संकेत गदादे, अमित टिळेकर, नवल कुंजीर, विद्याधर भोसले, मनोजकुमार शिवणकर, आकाश सरक, नरेंद्र बरवकर, नितीन खेडेकर, सोहेम मणेर, गणेश टेम्भूर्णी, सतीश वाघ, मंगेश लडकत, अमित गुंड, बाळासाहेब क्षीरसागर, किसान भोसले, राकेश भोसले, सुभाष पवार, प्रशांत घावटे, अक्षया  वाडेकर, राजाराम जगताप, स्वप्नील धारवाडकर, नाना ताम्हाणे आदी उपस्थित होते.

मांजरी उड्डाणंपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठविला विद्यमान आमदाराच्या हस्तक्षेपामुळे पुलाचे रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतुककोंडीचा धोका निर्माण होईल असा आरोप नगरसेवक बाळासाहेब घुले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर मध्ये भाजपला वारंवार डावलत असून आम्ही महायुती धर्मास तिलांजली देणार असा इशारा आंदोलकांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love