National Security Day :राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या(National Security Committee) स्थापनेला आज ४ मार्च ला ५३ वर्षे पूर्ण होत आहेत. तेंव्हापासून चार मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून देशभर साजरा करतात. इथे सुरक्षा म्हणजे संरक्षण (Defence) नाही तर, जीवित, सजीव, पर्यावरण, वित्त, सृष्टी याची अपघातांमुळे होणारी हानी टाळणे, अपघात कोठेही, कसाही, केव्हाही, कुणामुळेही होऊ शकतो व मोठ्या प्रमाणावर हानी होते. ती टाळण्याचा संकल्प करून ती टाळली तर देशाचे होणारी नुकसान वाचवून देशाचा विकास साधता येतो. त्यासाठीची जबाबदारी प्रामुख्याने प्रत्येक देशभक्त नागरीकांची आहे. कारण अपघातामुळे विकास कार्यास बाधा पोहोचते.
प्रदीर्घ अनुभवातून अपघात कशामुळे होतात हे कळते व अभ्यासक त्यांच्या अभ्यास व अनुभव याद्वारे काही नियम बनवतात व समितीच्या स्वीकृतीतून ती नियमावली वापरणे व त्याप्रमाणे व्यवहारात उतरवल्यास अपघाताचे प्रमाण कमी होते. प्रत्येक नागरीक बंधूभगिनींनी त्याची माहिती मिळवून कार्यान्वयन करायचे ठरवण्याचा हा दिवस.
संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे धोकादायक व घातक पदार्थांचे नऊ गटात विभाजन केले आहे त्या प्रत्येक गटात सामान्यपणे एका प्रकारचे, समान गुणधर्म असणारे पदार्थ एकत्र करतात. त्यात भौतिक घातकता, आरोग्य घातक व पर्यावरण घातक यांचा समावेश आहे.
स्फोटक पदार्थ: वायुरूप पदार्थ – दबावाखालील (compressed) , द्रवरूप वायू (Liquefied) , ज्वालाग्राही द्रवरूप पदार्थ, ज्वालाग्राही स्थायीरूप पदार्थ, ऑक्सिकरण पदार्थ, विषारी व संसर्गजन्य पदार्थ, किरणोत्सर्गी पदार्थ, संक्षारक, विविध पदार्थ असे ते ९ प्रकार आहेत.
सुरक्षा दिनाचे औचित्य साधून येथे आपण सैन्यदलांसाठी जो दारुगोळा, तोफगोळे, क्षेपणास्त्रे, बॉम्ब अशाप्रकारची जी शस्त्रास्त्रे लागतात त्या सर्वांसाठी जी स्फोटके, प्रस्फोटके, अति विस्फोटक पदार्थ, सैनिकी दारू -काम केलेले शक्ति काडतूसाची दारूचा उपयोग केलेला असतो व अशा पदार्थांच्या पासून शस्त्रास्त्रे बनवताना उत्पादनाच्या वेळी, साठवणूकीच्या वेळी वाहतूक व हाताळताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळावे लागतात. अशा शस्त्रांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असते.
वर्ग HD 1.1 अति विस्फोटके
वर्ग HD 1-2 प्रक्षेपण घातक
वर्ग HD 1.3 अग्निगोल
वर्ग HD 1. 4 नगण्य घातकता
वर्ग HD 1.5 निष्क्रीय विस्फोटके
वर्ग HD 1.6 निष्क्रीय तोफगोळे
प्रत्येक स्फोटकांचे गुणधर्म वेगळे असतात त्यामुळे वेगवेगळे परिणाम होतात व त्यानुसार त्याची काळजी घ्यावी लागते. अतिस्फोटकांचा स्फोट खालील कारणांमुळे घडतो उदा, आघात( Impact), धक्का (Shock), घर्षण (friction), उष्णता (Heat) आणि ठिणगी (Spark). जर आपल्याच भागात सर्व जवानांची सुरक्षितता महत्त्वाची असते. त्यासाठी वरील क्रियांपासून बचाव केला जातो तो अभिकामन, उत्पादनावेळीच तसेच साठवण, हाताळणी व फायर करेपर्यंत सर्व बाजूंचा संपर्क व क्रिया या नियंत्रणात केल्यावर सुरक्षितता जोपासता येते.
तोफगोळे व स्फोटक पदार्थ उत्पादन, साठवणूक व हाताळताना काय व कशी काळजी घ्यायची याच्या चांगल्या प्रकारच्या कामाच्या अनुभवातून काही आंतरराष्ट्रीय तर काही राष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शक तत्वे/सूचना वेळोवेळी अद्ययावत करून सर्व संबंधित व्यक्ति व संस्था यांना पाळणे अनिवार्य आहे. मोठ्या प्रमाणात हानी टाळून देश विकास व समृद्धीच्या मार्गावर पुढे नेता येतो.
प्रथमतः धोका किती, त्याची तीव्रता कीती याचे मोजमाप करतात. विष्लेषण करून तो धोका टाळण्यासाठीचे उपाय असतात, त्याची योजना करावी लागते व त्याचे क्रियान्वयन करतात. संभाव्य स्फोटाची तीव्रता पाहून संभाव्य धोका होऊनये, झालाच तर हानी अत्यल्प व्हावी यासाठी व मानवी जीवाची सुरक्षितता सर्वात महत्वाची या प्रमाणे उत्पादनाच्या वेळी बंधन घालतात. उदा. अति संवेदनशील स्फोटके खूप कमी वस्तुमान वापरणे, विद्युत, घर्षण, उष्णता, आघात होणारच नाहीत यासाठी त्या उत्पादन व हाताळणे वेळी कामगारांना सुती कपडे वापरणे. विशिष्ठ पादत्राणे, मोबाईल बंदी, तंबाखू, सिगारेट, काडेपेटी लायटर बंदी, विजेरी व ठिणगी उत्पन्न होणारी यंत्रे वापरण्यास बंदी. एका खोलीत किती स्फोटके घ्यावीत, किती कर्मचारी असावेत याच्यावर मर्यादा असे अनेक उपाय करून ही शस्त्रास्त्रे, दारुगोळा, स्फोटक बनवून आपल्या सशस्त्र सेनांना भारताच्या संरक्षणासाठी दिली जातात. पुण्याजवळील “अॅम्यूनिशन फॅक्टरी” हाय एकस्फ्लोजिव्ह फॅक्टरी आयुध निर्माणी देहूरोड असे कारखाने कार्यरत आहेत.
काशिनाथ देवधर
निवृत्त शास्त्रज्ञ DRDO