मुंबईचा महापौर  हा मराठीच  व्हायला हवा आणि तो होणारच : ठाकरे बंधूंचा एल्गार

मुंबईचा महापौर  हा मराठीच  व्हायला हवा आणि तो होणारच
मुंबईचा महापौर  हा मराठीच  व्हायला हवा आणि तो होणारच

Raj Thackeray and Uddhav Thackeray : “मुंबईचा महापौर  हा मराठीच  व्हायला हवा आणि तो होणारच,” असा ठाम निर्धार व्यक्त करत या आगामी राजकीय संघर्षाचे  संकेत ठाकरे बंधूंनी (Thackeray Brothers) मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये  दिले. महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रत्येक शहरामध्ये मराठी माणसाचा  आणि भाषेचा मान राखलाच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका मांडतानाच, “आमी हिंदू (Hindu) आहोत, पण हिंदी (Hindi) नाही,” या शब्दांत मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सुनावले.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ऐतिहासिक दाखला देताना सांगितले की, बडोद्यात (Baroda) गायकवाडांचे (Gaikwad) मराठा साम्राज्य असताना जर तिथे स्थानिक अस्मितेचा  आदर होतो, तर महाराष्ट्रातही मराठी अस्मितेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हिंदू (Hindu) आणि मराठी (Marathi) अशा शब्दांत फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उत्तर देताना, मुंबईवर (Mumbai) केवळ मराठी माणसाचाच हक्क असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीत बिघाडी? २५ जागांसाठी अर्ज भरण्याचे शिंदेंचे आदेश; धंगेकर अजित पवारांच्या भेटीला

राजकीय पटलावर ‘मुंबईकर’ (Mumbaikar) आणि ‘मराठी माणूस’ या शब्दावरून होणाऱ्या वादावरही यावेळी स्पष्टीकरण देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) तांत्रिक नियमांमुळे आणि जाहीरनाम्याला मंजुरी मिळवण्यासाठी ‘मुंबईकर’ (Mumbaikar) हा शब्द वापरला असला, तरी त्याचा मूळ उद्देश आणि अर्थ ‘मराठी माणूस’  हाच आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संयुक्त महाराष्ट्राच्या  लढ्यावेळी आजचा भाजप (BJP) किंवा त्यावेळचा जनसंघ (Jan Sangh) कुठे होता? मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या न्याय्य हक्कांसाठी हे पक्ष कधीही खंबीरपणे उभे राहिले नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी केली.

कोरोना (Corona) काळातील कामाचा लेखाजोखा मांडताना ‘मुंबई मॉडेल’  चा विशेष गौरव करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटना (WHO), देशाचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’ (The New York Times) सारख्या आंतरराष्ट्रीय  वृत्तपत्रांनी मुंबईच्या कोव्हिड व्यवस्थापनाचे कौतुक केले होते. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) गंगेच्या  पात्रात मृतदेह वाहत असताना, मुंबईत मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम झाले. चीनने (China) १५ दिवसांत रुग्णालय उभे केले असेल, तर मुंबईत आम्ही केवळ १८ दिवसांत फील्ड हॉस्पिटल (Field Hospital) उभे करून दाखवले, असा दावाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

अधिक वाचा  ‘विठू 'माऊली माझी‌’ रौप्य महोत्सवी कार्यक्रम बुधवारी : 'मराठी अभिजात‌’ पुस्तकाचे शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार प्रकाशन

निवडणूक आयोगाने (Election Commission) कोरोना काळातील कामाची पुस्तिका (Booklet) वाटण्यास मज्जाव केला असला, तरी आम्ही हे काम बेधडकपणे जनतेपर्यंत पोहोचवणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. लोकांच्या जीवाशी संबंधित असलेले हे काम निवडणूक आयोगाच्या परवानगीने केलेले नव्हते, त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love