आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा पत्नीनेच केला गेम : मुलाच्या मित्राबरोबरच्या अनैतिक संबंधातून केले कृत्य

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा पत्नीनेच केला गेम
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा पत्नीनेच केला गेम

पुणे(प्रतिनिधि)— भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच पैशाच्या आणि अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलाच्या मित्राबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातील अडथळा दूर व्हावा यासाठी मोहिनी वाघ हिने पाती सतीश वाघ यांचा खुनाची सुपारी देऊन गेम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी   मोहिनी वाघ हीला अटक केली आहे.

भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला सकाळी फिरायला गेले असताना  यांचं अपहरण करून अवघ्या पंधरा मिनिटातच त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर तब्ब्ल ७० वार करण्यात आले. मात्र हे पैसांसाठी केलेले अपहरण आहे असा बनवा करण्यात आला. मात्र पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली, दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलघडा झाला.

अधिक वाचा  आंतर-शालेय बॅडमिंटन स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल चमकले

या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी पवन श्यामसुंदर शर्मा (वय ३०, रा. फ्लॅट नंबर २०१ लक्ष्मी हाईट्स, काळुबाई नगर, आव्हाळवाडी), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३१, रा. अनुसया पार्क, गणेश नगर, डोमखेल रोड, वाघोली, मुळ रा. बीड), विकास ऊर्फ विक्की सीताराम शिंदे (वय २८,  रा. बजरंग नगर, बाजार तळ्याशेजारी, आव्हाळवाडी रोड, वाघोली, मुळ रा. अहिल्यानगर) आणि अक्षय ऊर्फ सोन्या हरीश जावळकर (वय २९, रा. फ्लॅट नंबर ३०५ विघ्नहर्ता सोसायटी, शामचंद्र पार्क, फुरसुंगी फाटा) यांना अटक केली आहे. या आरोपींच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर अतिश जाधव याला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र. मुलाच्याच वयाचा असल्याने अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला अली नाही. मात्र सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते. अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे .

अधिक वाचा  राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीची अकराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या

२००१ साली अक्षय जावळकरचे आईवडील सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले. अक्षयचे वय तेव्हा फक्त नऊ वर्षांचे होते. अक्षयचे आई वडील वडापावचा व्यास करायचे तर वाघ यांचं ब्लूबेरी नावाचं मोठं हॉटेल त्याच भागात होतं.

सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षयचे वाघ यांच्या घरी येणेजाणे सुरु झाले. मात्र अक्षय जेव्हा २१ वर्षांचा झाला तेव्हा २०१३ मध्ये त्याचे आणि त्यावेळी ३७ वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले.

दरम्यान, अक्षयने सिव्हिल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मात्र २०१६ ला अक्षयचे लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याचे आई वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत राहायला गेले.

अधिक वाचा  आपल्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे - हर्षवर्धन जाधव: १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनीचे प्रेमसंबंध कायम राहिले. सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादांना सुरुवात झाली. मोहिनी वाघ यांनी त्यामुळे सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं. त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार देखील आपल्या ताब्यात येतील असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे तिने अक्षयच्या मदतीने वाघ यांच्या हत्येचा कट रचला. अक्षयने त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतलं. ९ डिसेंबरला मॉर्निंग वोल्कसाठी गेलेल्या सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या पंधरा मिनिटातच त्यांची हत्या करण्यात आली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love