पुणेः इंटरनॅशनल सोसायटी फॉर एज्युकेशनल लीडरशिप (आयएसईल) आणि एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्य परिषदेचे २६ व २७ जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय साहित्य परिषदेद्वारे ‘Global Perspectives: Diverse Voices in English Literature’ या विषयावर संशोधक, लेखक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह साहित्यीक विविधतेवर चर्चासत्रे आयोजित करण्यात येतील. चर्चासत्रांद्वारे साहित्याला कशाप्रकारे सीमारेषेची बंधने नसतात व ते जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाद्वारे कशाप्रकारे प्रभाव पाडत आहे यावर प्रकाश टाकला जाईल. विद्यापीठात २६ व २७ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या या परिषदेत इंग्रजी साहित्यीक, शिक्षक, संशोधक व साहित्य रसिकांनी भाग घ्यावा व नावनोंदणीसाठी http://www.englishliteraturesummit.com या संकेस्थळाला भेट द्यावी असे आवाहन स्कुल ऑफ हाॅलिस्टिक डेव्हलपमेंटचे प्रमुख प्रा. डाॅ.अतुल पाटील यांनी केले आहे.