मेडट्रॉनिक आणि सिम्‍बायोसिस इंटरनॅशनल मध्ये सहयोग : मेडट्रॉनिक आणि सिम्‍बायोसिस इंटरनॅशनल मध्ये सहयोग

सिम्‍बायोसिस येथे अत्‍याधुनिक एक्‍स्‍पीरिअन्‍स सेंटरचे उद्घाटन
सिम्‍बायोसिस येथे अत्‍याधुनिक एक्‍स्‍पीरिअन्‍स सेंटरचे उद्घाटन

पुणे- सिम्‍बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) ने आपली घटक संस्‍था सिम्‍बायोसिस सेंटर फॉर हेल्‍थ स्किल्‍स (SCHS)च्‍या माध्‍यमातून आरोग्‍यसेवा तंत्रज्ञानामधील जागतिक अग्रणी कंपनी मेडट्रॉनिकसोबत धोरणात्‍मक सहयोग केला आहे. या सहयोगांतर्गत सिम्‍बायोसिस मेडट्रॉनिक एक्‍स्‍पीरिअन्‍स सेंटर, ‘द टेक्नोव्हर्स’ चे उद्घाटन केले आहे. हे आघाडीचे प्रशिक्षण केंद्र भारतात आरोग्‍यसेवा शिक्षण, प्रशिक्षण आणि सराव प्रगत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

हे एक्‍स्‍पीरिअन्‍स सेंटर भारतातील अद्वितीय एकीकृत केंद्र आहे, ज्‍यामध्‍ये एकाच छताखाली प्रगत शस्‍त्रक्रिया प्रशिक्षण आणि कॅडेव्‍हर-आधारित शिक्षण मिळेल. हे अत्‍याधुनिक केंद्र प्रगत क्रॅनियल, स्‍पायनल व ऑर्थोपेडिक तंत्रज्ञानांसह ब्रेन व स्‍पायनल रोबोटिक्‍स, सर्जिकल नेव्हिगेशन सिस्‍टम्‍स आणि ३डी इमेजिंगचा वापर करत प्रत्‍यक्ष कॅडेव्‍हर प्रशिक्षण देते, ज्‍यामधून अनुभवात्‍मक शिक्षण, नाविन्‍यता आणि प्रबळ शैक्षणिक-उद्योग सहयोगाप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते.

अधिक वाचा  सुजय विखे यांनी केली अजित पवारांची पाठराखण : म्हणाले, ज्यांना लग्नाची पत्रिकाच येत नाही त्यांचा..

हे एक्‍स्‍पीरिअन्‍स सेंटर सातत्‍यपूर्ण शिक्षण परिसंस्‍था म्‍हणून डिझाइन करण्‍यात आले आहे, जे न्‍यूरोसर्जन्‍स, ऑर्थोपेडिक, स्‍पाइन व ईएनटी सर्जन्‍सना अनुभवात्‍मक प्रशिक्षण लवकर उपलब्‍ध करून देत आवश्‍यक कौशल्‍ये शिकण्‍यास सक्षम करण्‍याची आशा करते. या सेंटरचा वास्‍तविक विश्वातील स्थितींचा सराव करत क्लिनिकल तंत्रे निपुण करण्‍यासाठी प्‍लॅटफॉर्म प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे, जो प्रशिक्षणार्थींना रूग्‍णांसाठी दर्जात्‍मक केअर सेवा देण्‍यास सक्षम करेल.

डॉ. विद्या येरवडेकर, प्र- चान्सलर, सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) या उपक्रमाचे धोरणात्‍मक महत्त्व निदर्शनस आणत म्‍हणाल्‍या, ”हे सेंटर शैक्षणिक उत्‍कृष्‍टता आणि जागतिक प्रासंगिकतेप्रती आमच्‍या प्रयत्‍नामधील मोठा टप्‍पा आहे.”

मेडट्रॉनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष, मनदीप सिंग कुमार यांनी या सहकार्यामागील सामायिक दृष्टिकोनावर भर दिला: ‘हे सहकार्य आरोग्यसेवा शिक्षणात प्रगती करण्यासाठी आणि विकसित होत असलेल्या क्लिनिकल गरजांना प्रतिसाद देण्यासाठी नवीनतम आरोग्य तंत्रज्ञान आणि ज्ञानाने क्लिनिशियनना सक्षम बनवण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेवर प्रकाश टाकते. मेडट्रॉनिकमध्ये, आम्ही करत असलेले प्रत्येक कार्य वेदना कमी करणे, आरोग्य पुनर्संचयित करणे आणि आयुष्य वाढवणे या आमच्या ध्येयाने प्रेरित असते. काळजीच्या मानकांना उंचावून आणि रुग्णांच्या परिणामांमध्ये सुधारणा करून, आम्ही हे ध्येय वास्तविकात आणत राहतो.

अधिक वाचा  Air India flight crashes : अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात: सर्व २४२ प्रवाशांचा दुर्दैवी अंत, शहरात शोककळा

ही भागीदारी हे आजीवन शिक्षणाचे एक महान संधीस्थान आहे, जे आपल्या आरोग्यव्यावसायिकांच्या क्लिनिकल पायाभरणीला अधिक सक्षम करेल,” असे सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या मेडिकल आणि हेल्थ सायन्सेस विभागाचे प्रॉव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर यांनी सांगितले. “प्रगत तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित प्रशिक्षणाची उपलब्धता करून देऊन, आपण थेट रुग्णांच्या परिणामांमध्ये सुधारणा आणि वैद्यकीय प्रथेमध्ये उत्कृष्टतेस हातभार लावत आहोत.

 

हे केंद्र न्यूरोसर्जन, स्पाइन सर्जन, ऑर्थो सर्जन आणि ईएनटी सर्जन या सुपर-स्पेशालिस्टना प्रशिक्षण देईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे भारतातील आरोग्यसेवा कर्मचारी बळकट होतील आणि रुग्णांच्या यशात थेट योगदान मिळेल आणि क्षमता-निर्मिती, नवोपक्रम आणि शैक्षणिक-उद्योग सहकार्याचे केंद्र म्हणून काम करेल.

या उपक्रमामधून सिम्‍बायोसिस इंटरनॅशनल युनिव्‍हर्सिटीचा नाविन्‍यतेला चालना देण्‍याचा दृष्टिकोन दिसून येतो, जेथे युनिव्‍हर्सिटी अनुभवात्‍मक शिक्षणाला प्रेरित करत आहे आणि धोरणात्‍मक सहयोग व परिवर्तनात्‍मक आरोग्‍यसेवा प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून दीर्घकालीन सामाजिक प्रभाव निर्माण करत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love