पुण्यनगरीत अवतरला भक्तीचा महासागर : माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत

पुण्यनगरीत अवतरला भक्तीचा महासागर : माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत
पुण्यनगरीत अवतरला भक्तीचा महासागर : माउली व तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत

पुणे(प्रतिनिधी)— आषाढीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी । तीर्थव्रत ।। 

पावलागणिक होणारा विठुनामाचा  गजर…टाळ-मृदंगाचा नाद..ज्ञानोबा-तुकोबा (Dnyanoba-Tukoba) नामाचा जयघोष…अन् या नादासवे पुढे सरकणारा वैष्णवांचा  महाप्रवाह…अशा भारलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली (Sant Dnyaneshwar Mauli) व जगद्गुरू तुकाराम महाराज (Jagadguru Tukaram Maharaj) यांच्या पालख्यांनी (Palkhi) शुक्रवारी पुण्यनगरीत (Pune) प्रवेश केला. पुणेकरांनी अत्यंत भक्तिभावात दोन्ही पालख्यांचे स्वागत केले.

तुकोबांची पालखी आकुर्डीहून (Akurdi), तर माउलींची पालखी आळंदीहून (Alandi) सकाळी मार्गस्थ झाली. सकाळच्या न्याहारीमुळे बळ प्राप्त झालेले वारकरी टाळ-मृदंगाच्या गजर, अभंगाचा ताल व पावसाच्या साथसंगतीत झपझप पावले टाकू लागले. पावलागणिक वारकऱयांचा उत्साह वाढू लागला. तुकोबांच्या पालखीने दुपारी दापोडीत (Dapodi) विसावा घेतला. त्यानंतर पालखी पुन्हा पंढरीच्या (Pandharpur) मार्गावर आली. तोवर वाकडेवाडीतील (Wakdewadi) मरिआई गेट चौक  ते पाटील इस्टेटपर्यंतचा (Patil Estate) सारा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेला. तुकोबा-माउलींच्या दर्शनाकडे सगळ्यांचेच डोळे लागले होते.

अधिक वाचा  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन :विज्ञान प्रसाराचा ध्रुवतारा निखळला

पाटील इस्टेट चौकात तुकोबांच्या पालखी सोहळय़ातील नगारा  झडला अन् भाविकांचे डोळे एकवटले. अश्वांचे आगमन होतात भाविकांनी त्यांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर बरोबर विविधरंगी फुलांनी सजविलेला तुकोबांचा रथ  दृष्टीस पडला. तुकोबांची पालखी येताच दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली. सायंकाळी पाचच्या सुमारास पालखीचे आगमन झाले. महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. रथातील तुकोबांची पालखी अन् पादुकांवर (Paduka) माथा टेकवत अनेकांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. तर काहींनी डोळे भरून पादुकांचे दर्शन घेतले.

तुकोबांच्या पालखीच्या आगमनानंतर भाविकांच्या नजरा संगमवाडी (Sangamwadi) पुलावर स्थिरावल्या. दिघी (Dighi), कळस (Kalas), विश्रांतवाडी (Vishrantwadi), फुलेनगरमार्गे (Phulenagar) पालखी संगमवाडीच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागली. पालखी सोहळय़ाचा नगारा झडलाच सर्वांची उत्सुकता ताणली गेली. अश्वांच्या आगमनाने वातावरणात चैतन्य पसरले. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात अन् दिंडय़ादिंडय़ातून होणाऱया हरिनामाच्या गजरासवे माउलींची पालखी अवतरली. माउलींच्या पादुकांवर माथा टेकवण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. पुणे महापालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.

अधिक वाचा  बेताल वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर कारवाई करा : मराठा क्रांती मोर्चाची मागणी

दोन्ही पालख्यांचा संगम होताच वैष्णवांच्या या सागराला महासागराचे रूप प्राप्त झाले. या पालखी सोहळय़ावर हेलिकॉप्टरलमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. वैष्णवांचा हा महाप्रवाह संचेती चौक, फर्ग्युसन रस्तामार्गे  ज्ञानेश्वर पादुका चौक व तुकाराम पादुका चौकात  आला. ग्यानबा-तुकारामचा (Dnyanba-Tukaram) एकच गजर जाहला. अवघी पुण्यनगरी दुमदुमून गेली. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी पालख्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. माउलींची पालखी रात्री पालखी विठोबा मंदिरात (Palkhi Vitthoba Mandir), तर तुकोबांची पालखी निवडुंगा विठोबा मंदिरात (Nivdung Vitthoba Mandir) मुक्कामासाठी विसावली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या रविवारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Deep Research

अधिक वाचा  रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनास्त्र : आप'सह बिटिया फाउंडेशन, गुलाबो गँगकडून ‘चिल्लर फेको आंदोलन'

 

Canvas

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love