महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना केले अलविदा


महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना केले अलविदा

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अव्वल यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आज (१५ ऑगस्ट) अचानक अत्यंत साधेपणाने आंतरराष्ट्रीय क्रीकेटमधून निवृत्ती जाहीर केली. महेंद्रसिंग धोनीने पंधरा वर्षे भारतीय संघाची सेवा केली आणि आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु होती.

१५ ऑगस्टला संध्याकाळी इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट टाकत आपल्या चाहत्यांना अलविदा केले. आपले प्रेम आणि समर्थनासाठी खूप-खूप धन्यवाद १९:२९ वाजल्यापासून मला रिटायर्ड समजा असे त्याने म्हटले आहे. ‘ मै पल दो पल का शायर हुं’ हे गाणेही त्याने पोस्ट केले आहे.

महेंद्रसिंग धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानले आणि  निवृत्तीची घोषणा केली. भारतीय संघाच्या कर्णधार पदाशिवाय महेंद्रसिंग धोनीने उत्कृष्ट फिनिशरची भूमिका बजावली होती.

भारतीय क्रिकेट संघाचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या धोनीने ९० कसोटी सामने खेळत ३८.०९ च्या सरासरीने ६ शतकव 33 अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. ३५० वनडे खेळलेल्या धोनीची सरसरी ५०.५७ इतकी आहे. त्याने १० शतक आणि ७३ अर्धशतकांसह १०,७७३ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटचे तो ९८ सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने १६१७ धावा केल्या आहेत. कसोटीच्या यष्टीरक्षण करताना त्याने २५६ झेल घटले तर ३८ स्टंपिंग केलं आहेत. वनडेट त्याने ३२१ झेल व १२३ स्टंपिंग आणि ट्वेंटी-२०मध्ये ५७ झेल आणि ३४ स्टंपिंग त्याच्या नावावर आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  चीन आणि पाकिस्तानचा भारताविरुद्ध जैविक युद्धाचा कट;तीन वर्षांसाठी गुप्त करारही केला?