Maharashtra Sahitya Parishad election dispute : मसाप निवडणूक : आमंत्रणांचे आमिष आणि दबाव तंत्राचा वापर; ‘परिवर्तन पॅनेल’वर संरक्षण कृती समितीची टीका

Maharashtra Sahitya Parishad election dispute
Maharashtra Sahitya Parishad election dispute

Maharashtra Sahitya Parishad election dispute :विद्यमान अनधिकृत कार्यकारिणीने निवडणूक न घेता गेली पाच वर्षे साहित्य परिषदेचा स्वत:कडे ताबा ठेवला असल्याचा आरोप महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीचे कार्याध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. निवडणुकीत लढवण्यात काही गैर नसून, तो प्रत्येकाला अधिकार असल्याचेही संघ, भाजपच्या एन्ट्रीबाबत बोलताना त्यांनी सांगितले.
कुलकर्णी म्हणाले, विनोद कुलकर्णी आणि मिलिंद जोशी साहित्य संमेलन व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांना साहित्य परिषदेत हस्तक्षेत करू नका, अशी धमकी देतात. विनोद कुलकर्णी व त्यांचे प्रतिनिधी निवडणुकीतील विरोधी उमेदवारांवर दबाव आणून उमेदवारी अर्ज भरू नका, असे प्रयत्न करून निवडणूक बिनविरोध करून येथील आपली बेकायदेशीर सत्ता कायम राहील, असा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इमारतीचा वापर आपल्या पॅनेलचे निवडणूक कार्यालय असल्यासारखा केला जात आहे. याशिवाय न्यायालयात महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यकारिणी विरोधातील याचिकांचे निकालाच लागू नयेत यासाठी सर्व न्यायालयीन हातखंडे वापरले आहेत. 100 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रमुख जबाबदारी देऊ, मानसन्मान देऊ, अशी लालूच दाखवणे असे प्रकार ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्य परिषदेच्या पुरस्काराचे आमिष साहित्यिकांना दाखवून एक दबावाचे राजकारण करणे, अनाधिकाराने संस्थेची घटना दुऊस्ती करणे, सामान्य मराठी साहित्य प्रेमी संस्थेचे सभासद होता येणार नाही, यासाठी सभासद शुल्क वाढ करणे, ग्मराठी साहित्य प्रेमींची सभासद नोंदणी बंद करणे, परिचयातील नात्यातील काही लोकांना सदस्य करून घेणे, धर्मादाय आयुक्त कार्यालय मान्यता नसलेल्या घटना दुऊस्ती आधारे संस्थेच्या निवडणुका घोषित करणे, निवडणुकीसाठी उपयोगात आणलेल्या मतदारयाद्या जाणीवपूर्वक सदोष ठेवणे आणि आता विरोधी आघाडी उमेदवारांच्या खासगी बैठकीचे चित्रण सार्वजनिक करणे व आरोप करणे हा विद्यमान कार्यकारिणीच्या निवडणूक राजकारणाचा भाग आहे, असे कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले.
परिवर्तन पॅनेल सर्व बेकायदेशीर व दबाव तंत्र वापरून महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 7/12 आपल्या नावावर करून घेत आहे. याच्याविऊद्ध कृती समिती सर्व स्तरावर संघर्ष करेल. तो आम्ही गेली दोन वर्ष करीत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  मावळ तालुक्यात बंजारा समाजभवनसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी