राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे : राज ठाकरे

राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे
राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे

पुणे(प्रतिनिधी)– महाराष्ट्रातील राजकीय भाषा खालच्या स्तराला गेली असून, या राजकारण्यांना खडे बोल सुनावण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे,असे परखड मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

दिल्ली येथे होणाऱ्या  ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, सरहदचे प्रमुख संजय नहार, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. सदानंद मोरे, श्रीपाल सबनीस आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, आत्ताच्या राजकारण्यांना ठणकावून सांगण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील साहित्यिक, कवी मी पाहत आलोय. मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात, मनात रुजलेला असायचा आणि योग्यवेळी ठणकावून सांगणे, राजकारण्यांना, बिघडलेल्या सांस्कृतिक बाबींना सांगण्याची हिंमत, धमक त्यांच्यात होती. ती आज कमी झालेली दिसत आहे. कुठल्याही ट्रोलिंगचा विचार करू नका. मी आजपर्यंत अनेक भाषणे दिली आहेत. जे बोलायचे ते बोललो आहे. परंतु सोशल मीडियात ज्या गोष्टी येतात, त्या मी वाचायला जात नाही. त्या भानगडीत जात नाही. माझे बोलून झाले. मग विषय संपला. कुठल्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायला मी जात नाही. जे तुमच्यावर प्रेम करतात ते स्पष्टीकरण मागत नाहीत आणि जे तुमचा द्वेष करतात, ते तुमचे स्पष्टीकरण ऐकत नाही. ही जबाबदारी आता साहित्यिकांनी हातात घेणे गरजेचे आहे.

अधिक वाचा  कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा - अजित पवार

देशाला दिशा देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र 

महाराष्ट्रात चाललेला जो खेळ, सर्कस झालीय, कुणी विदुषकी चाळे करत आहे. मंत्रालयात कुणी जाळय़ावर उडी मारत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात, असे अनेक लोक आहेत, त्यांना जाळय़ांशिवाय उडय़ा मारायला लावल्या पाहिजेत. देशाला दिशा देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. पण आता भाषा इतक्मया खालच्या थराला गेली आहे. ज्या महाराष्ट्रातील बुजूर्ग म्हणावे, तेच त्यांच्या आहारी गेले आहेत, असे म्हणत ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love