किसान २०२३ कृषि प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन 

Kisan 2023 Agricultural Exhibition was inaugurated
Kisan 2023 Agricultural Exhibition was inaugurated

पुणे : भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन (Agriculture Exibition) असलेल्या किसान २०२३ (Kisan 2023)या ३२ व्या कृषिप्रदर्शनाचे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी ( Pune International Exhibition and Convention Centre, Moshi) येथे उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पहिल्या येणार्‍या शेतकर्‍यांच्या गटातर्फे हे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या शेतकर्‍यांचा समावेश होता. हे प्रदर्शन १७ डिसेंबर २०२३ पर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहील. (Kisan 2023 Agricultural Exhibition inaugurated)

 १५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ४५० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, ५ दिवसांमध्ये  देशभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.  

अधिक वाचा  पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये स्वच्छता गृहात ड्रग्जचे सेवन : व्हिडिओ व्हायरल : पाचजण ताब्यात

किसान प्रदर्शनाला शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व  शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे.

मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील. प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी  स्पार्क या दालनाचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञान व नाव कल्पनांना चालना देण्यात येईल.

अधिक वाचा  संकर्षण क-हाडे, मकरंद जोशी यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार 

पूर्वनोंदणी : प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर  मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे.१८ राज्यातील शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून  ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.

प्रदर्शकांची माहिती व संपर्क : किसान मोबाईल ॲपवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती उपलब्ध आहे. नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा प्रदर्शक संस्थांशी संवाद प्रदर्शनाच्या आधीपासूनच सुरु झाला आहे.

किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क :  www.kisan.in

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love