35 व्या पुणे फेस्टिवलमध्ये जाणता राजाने प्रेक्षकांना जिंकले

Janata Raja won over the audience at the Pune Festival
Janata Raja won over the audience at the Pune Festival

पुणे-  पद्मविभूषण शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्यातील छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील शिवजन्म, राज्याभिषेक, अफझल खान स्वारी, लाल महाल छापा अशा विविध प्रसंगांवर आधारित ‘जाणता राजा’  हा  भव्य  कार्यक्रम  सोमवार दि. २५  सप्टेंबर रोजी सायं ८.०० वा. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला.

भारतीय कला वैभव तर्फे सूत्रधार म्हणून मंदार परळीकर हा कार्यक्रम सादर केला  असून त्यामध्ये संस्थेचे १५० कलावंत सहभागी झाले. याचे दिग्दर्शक योगेश शिरोळे, साहित्य व कपडेपट आनंद जावडेकर  आणि  नेपथ्य  महेश  रांजणे  यांचे आहे. यातील विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेली गीते गायक फैय्याज आणि शंकर घाणेकर यांनी गायली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  युवा कलाकारांनी गाजवला तालचक्र महोत्सवाचा दुसरा दिवस-बहारदार सांगीतिक मैफलीनी पुणेकर मंत्रमुग्ध