महिला आयोगाने न्याय देण्याची भुमिका स्विकारली नाही हे दुर्दैव : विजय वडेट्टीवार यांची टीका

महिला आयोगाने न्याय देण्याची भुमिका स्विकारली नाही हे दुर्दैव
महिला आयोगाने न्याय देण्याची भुमिका स्विकारली नाही हे दुर्दैव

पिंपरी – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चिघळत असताना दोन-तीन दिवस महिला आयोगाचा त्यात लक्ष घालण्याचा रोल दिसत नव्हता. राजकीय भेद बाजूला ठेवून त्यांनी पुढे यायला पाहिजे होते. याप्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची भुमिका स्विकारायला पाहिजे होती. मात्र, दुर्दैवाने ती आम्हाला दिसली नाही. हे राज्याचे, महिलांचे दुर्दैव, आहे, अशी टीका काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर केली.

वाकड येथे वैष्णवी हिच्या कुटूंबियांची विजय वडैट्टीवार यांनी रविवारी (दि. २५) भेट घेतली आणि सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, महिलांवर अत्याचाराच्या प्रमाणात महाराष्ट्र सगळ्या राज्यांच्या पुढे गेला आहे. महिलांच्या, मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात मागील पाच वर्षात ६६ हजार महिला बेपत्ता आहेत. दर दोन तास तेरा मिनिटांमध्ये एका महिलेचा खून होतो किवा तिच्यावर अत्याचार होतो. ही सगळी परिस्थिती बघता राज्यात कायद्याचा जो धाक असला पाहिजे, तो दिसत नाही. पोलीस असे का वागत आहेत. पोलीसांचा धाक का दिसत नाही. कायद्याचा बडगा कठोरपणे का उगारला जात नाही. महाराष्ट्र अधोगतीला चालल्याचे हे निदर्शन आहे. राज्याच्या महिला आयोगाला पूर्ण वेळ दिला पाहिजे. दोन-तीन दिवस मी पाहत होतो. महिला आयोगाचा त्यात लक्ष घालण्याचा रोल दिसत नव्हता.

अधिक वाचा  राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा पण, त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी..!!

या प्रकरणाची संपूर्ण माहिती आपण कुटूंबाकडून घेतली. क्रुर मारहाणीचे ते सर्व फोटो पाहिले. ज्या पद्धतीने वैष्णवीला मारहाण झाली ते पाहता हगवणे कुटूंब माणूस नाही राक्षस आहेत. मानवतेला काळीमा फासणारे कृत्य त्या नालायक कुटूंबाने केले आहे. नऊ महिन्याचे बाळ असताना कोणीही आत्महत्या करू शकत नाही. तिला मारून तिचा जीव घेतला आहे. पोलीसांचा तपासही त्या दिशेने झाला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत हगवणे कुटूंबासारख्या राक्षसी प्रवृत्तीला माफ करता कामा नये. त्यांना चौकात आणून फाशी दिली पाहिजे. ते फाशी देण्याच्याच लायकीचे आहेत. कोणत्याही पक्षाचा माणूस असेल तर अशा प्रवृत्तीला ठेचले पाहिजे. या प्रकरणात ज्याच्याकडे हे बाळ होते तो आरोपी निलेश चव्हाण हा फरार आहे.

पोलीसानां तो का सापडत नाही, असा सवाल करीत पोलीसांना आजकाल गुंड लवकर मिळत नाहीत. चव्हाण गुंड प्रवृत्तीचा आहे. पोलीसांना तो सापडत नाही आणि सज्जन माणसाला मात्र लगेच शोधतात. हे कायद्याचे खरेच रक्षक आहेत का. यांना महाराष्ट्रातील सामान्य लोकांची सुरक्षा करायची आहे का की गुंडांची हा प्रश्न यातून निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

अधिक वाचा  वैष्णवी हगवणे हिचे लहान बाळ अखेर तिच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या ताब्यात

सुपेकर यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे

 पोलीस महानिरीक्षक जालींदर सुपेकर यांचे नाव याप्रकरणात जोडले जातेय यावर वडेट्टीवार म्हणाले, मी त्याची ऑडीओ क्लीप ऐकली आहे. यात त्यांचा पक्षपातीपणा दिसतोय. ते यात सहभागी आहेत, असे नाही पण एक पोलीस अधिकारी म्हणून त्यांची भुमिका नि:पक्षपाती नाही. ती एखाद्याच्या बाजूने दिसते. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love