चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटतर्फे 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे पुण्यात आयोजन

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे पुण्यात आयोजन
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे पुण्यात आयोजन

पुणे : चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे पुण्यात जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे 7 ते 9 मार्च 2025 दरम्यान 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2025 (इंटरनॅशनल डायबेटिस समिट) चे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मधुमेहाच्या धोक्याचा व गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती व सिंबायोसिस पुणेच्या प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ.विद्या येरवडेकर आणि सन्माननीय अतिथी म्हणून युके नॅशनल इन्स्टिट्युट फॉर हेल्थ रिसर्च (एनआयएचआर) चे संचालक आणि सेंटर फॉर एथनिक हेल्थ रिसर्चचे संचालक आणि द रिअल-वर्ल्ड एव्हिडन्स युनिटचे संचालक डॉ.कमलेश खुंटी हे उपस्थित असतील.

अधिक वाचा  वाल्मीक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील

या परिषदेत मधुमेहाच्या गुंतागुंतींचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन संशोधन आणि मधुमेह व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये मधुमेहाचा सामना करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, गरोदरपणातील मधुमेह आणि प्रॅक्टिकल इन्शुलिन या विषयावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

अमेरिकेतील मेयो क्लिनिक, यूकेमधील इंपिरिअल कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टर, युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिफ, युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग,युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडन,स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्युट,ऑस्ट्रेलियातील मोनाश युनिव्हर्सिटी आणि हाँगकाँगमधील ग्लेनईगल्स येथील तज्ञ, यांसह  70 हून अधिक नामवंत भारतीय तज्ञ या परिषदेत संवाद साधणार असून 2,000 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील.

चेलाराम फाउंडेशन डायबेटिस रिसर्च अवॉर्ड्स – 2025  

मूलभूत संशोधन तथा क्लिनिकल संशोधन श्रेणीतील (रु. 2 लाख आणि रु. 1 लाख पुरस्कार राशी) जिंकण्यासाठी 75 हून अधिक युवा संशोधक प्रबंध सादर करणार आहेत. चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट आणि ब्लू सर्कल फाऊंडेशन तर्फे रविवार 9 मार्च रोजी आयोजित केलेल्या “रन फॉर डायबेटिस” – 3 किमी आणि 5 किमी मॅरेथॉनमध्ये टाइप 1 मधुमेह असलेल्या मुलांसह 500 स्पर्धक सहभागी होतील.

अधिक वाचा  मानवी राखीतून दिला सर्वधर्मसमभावाचा संदेश : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूस्तर्फे गंगोत्री धाम तिबेट बॉर्डरवरील हर्षिल गावामध्ये भारतीय सैनिकांसोबत रक्षाबंधन

9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2025 चे आश्रयदाता आणि चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे अध्यक्ष श्री. लाल चेलाराम म्हणतात की, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट ही संस्था मधुमेहाचे उपचार, संशोधन, शिक्षण आणि जागरूकता अशा उपक्रमांद्वारे मधुमेहाचा सामना करण्यात अग्रगण्य राहिली आहे.

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन ए.जी. म्हणाले की, 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2025 मध्ये प्रख्यात मधुमेह तज्ञ हे मधुमेह उपचार पध्दतींबाबत मार्गदर्शन करतील. या परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांचे मधुमेह व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल.

 

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक व विंग कमांडर (डॉ.) हर्षल मोरे (निवृत्त) म्हणाले की,चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटमध्ये एकाच छताखाली अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध असून, मधुमेह आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी संस्था अग्रस्थानी राहिली आहे.

अधिक वाचा  मी स्वतःच माझा आयडॉल : नेमबाजपटू स्वप्निल कुसाळे याचे मत

 

9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – 2025 चे उद्दिष्ट देशातील आरोग्यसेवेत कार्यरत असणाऱ्यांना मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतींबद्दल सर्वसमावेशक ज्ञान प्रदान करणे आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love