संचेती परिवाराचे शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय संमेलन उत्साहात संपन्न : विविध कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरला रंग

संचेती परिवाराचे शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय संमेलन उत्साहात संपन्न
संचेती परिवाराचे शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय संमेलन उत्साहात संपन्न

शिर्डी(प्रतिनिधि) – संचेती परिवाराचे आंतरराष्ट्रीय संमेलन शिर्डी येथे साई पालखी निवारा या ठिकाणी संपन्न झाले. या संमेनलात महाराष्ट्रसह जगभरातून संचेती परिवाराचे सदस्य एकत्र आले. या संमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवशीय संमेलनाचे उदघाटन मलकापूरचे भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनी केले. यावेळी मान्यवर उपस्थितीत होते.

दोन दिवशीय संमेलनात पहिल्या दिवशी उदघाटन सोहळयात नवकार मंत्र, गणेश वंदना व त्यानतंर स्वागत गीतांनी या कार्यक्रमाचे सुरुवात झाली. त्यानंतर संमेलनाच्या उद्देशाबाबत स्वागताध्यक्ष अॅड. गौतम संचेती (छ. संभाजीनगर) यांनी भाषण केले. त्यानंतर या संमेनलात अभय संचेती (पुणे), रविंद्रकुमार बन्सीलाल संचेती (वैजापूर), यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर दुस-या सत्रात सत्रात संचेती परिवाराचा इतिहास यावर दिल्लीचे अशोक संचेती यांनी माहिती दिली. त्यानंतर संचेती परिवारातील विविध क्षेत्रात काम करणा-या ११ मान्यवरांचा जीवन गौरव देऊन सत्कार करण्यात आला. रात्री अखंड ज्योतसह भव्य कुल माताजी सच्चीयाय एव बाबा रामदेवजी की भक्ती असा भक्तीसंगीतावर कार्यक्रम झाला. तर दुस-या दिवशी युवकांचा सत्कार व त्यानंतर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात

या संमेलनात सहा वेळा आमदार झालेल्या मलकापूर विधानसभेचे आमदार चैनसुख संचेती यांचा सत्कार करण्यात आला. या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून वालचंदजी संचेती (उद्योजक, पुणे), बेबीलाल संचेती (अध्यक्ष एसएनजेबी, चांदवड), मोहनलालजी संचेती (बिल्डर, पुणे), रविंद्रकुमार बन्सीलाल संचेती (वैजापूर), विनोदजी संचेती (हैद्राबाद), जुगराजजी संचेती (उपसरपंच, मोमासर, राजस्थान), कंचनदेवी संचेती (सरपंच, डावरा, राजस्थान), तुनसुखजी संचेती (इंदौर, ग्वालियर), प्रविण बुधमलचजी संचेती (नाशिक), अरविंदजी संचेती (पूर्व अध्यक्ष, जैन विश्व भारती, अहमदाबाद), दिलीपकुमार संचेती (खेतीया ) यासह मान्यवर उपस्थित होते.

या संमेलनाला सर्व संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष अॅड. गौतम संचेती (छ.संभाजीनगर) कार्याध्यक्ष प्रफुल्ल संचेती (नाशिक), अभय संचेती (पुणे), सचिव पूनमचंद संचेती (वडाळीभोई), उपाध्यक्ष महेश संचेती (पुणे), शोभाचंद संचेती (वैजापूर), इंदरचंद संचेती (लोणार), अनिल संचेती (छ.संभाजीनगर), संतोष संचेती (मलकापूर), धनराज संचेती (अहिल्यानगर), सहसचिव संजय एस. संचेती (छ. संभाजीनगर), कोषाध्यक्ष संतोष संचेती (नाशिक), सहकोषाध्यक्ष महावीर संचेती (शिर्डी), रमेशचंद संचेती (वडाळीभोई), जनसंपर्क प्रमुख पियूष संचेती (अहिल्यानगर) योगेश संचेती (नाशिक) यांनी केले. या संपूर्ण संमेलनाचे सुत्रसंचालन पत्रकार गौतम संचेती (नाशिक), उत्तरा तिडके, संतोष संचेती यांनी केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love