लोकसभा निवडणुकीत राज्यात आम्ही 40 च्या पार जाणारच – देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही
मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही

‘मी सर्व सर्वेक्षणाचा सन्मान करतो. ‘ए व्होटर असो की, बी व्होटर असो की, डी व्होटर असो किंवा झेड व्होटर असो हे लक्षात ठेवा की देशात फक्त मोदीजींची (Modi) हवा आहे. जनतेने ठरवले आहे की फक्त मोदींनाच मत द्यायचे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राज्यात आम्ही ४० च्या पार जाणार म्हणजे जाणारच’, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. (In the Lok Sabha elections, we will cross 40 in the state)


​नुकत्याच झालेल्या काही राजकीय सर्वेक्षणांत भाजपच्या जागा कमी होत असल्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

अधिक वाचा  शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येणार

करोनाबाबत राज्यात काळजी घेण्यासारखी स्थिती -देवेंद्र फडणवीस

‘करोनाबाबत (Corona) राज्यात काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. या संपूर्ण परिस्थितीकडे राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन करोनासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात आदेश दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love