‘अखिल भारतीय मुशायरा’ मध्ये रसिकांची गझल आणि शायरीला भरभरून दाद

In 'Akhil Bhartiya Mushaira', ghazals and shayari are appreciated by fans
In 'Akhil Bhartiya Mushaira', ghazals and shayari are appreciated by fans

पुणे: पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’ या कार्यक्रमात अकोल्याचे शायर अबरार काशिफ यांनी सादर केलेल्या

       दर्द ए मोहब्बत, दर्द ए जुदाई दोनो को एक साथ मिला |

       तू भी तनहा, मै भी तनहा आ इस बात पे हात मिला ||

गझल को इतने महेजोमे, इतना लहेजा पसंद आया |

       की शहजादी को एक मजदूर का बेटा पसंद आया ||

या अशा अनेक शायरींना रसिकांनी वाहवा.. वाहवा.. क्या बात है… म्हणत… वन्समोर देत दिलेली दाद,  टाळ्यांचा कडकडाट,  तरुणाईने शिट्या वाजवून दिलेली दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पुणे फेस्टिवल अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’ हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे शुक्रवार( दि. 22 सप्टेंबर) पार पडला.

‘पुणे फेस्टिवल’ अंतर्गत ‘अखिल भारतीय मुशायरा’चे  डॉ.पी. ए. इनामदार(कुलपती, डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार (अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) यांनी  आयोजन केले. यावेळी पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष अॅड. अभय छाजेड, डॉ.पी. ए. इनामदार(कुलपती, डॉ. पी.ए. इनामदार विद्यापीठ, पुणे) आणि श्रीमती आबेदा पी. ए. इनामदार (अध्यक्ष, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, पुणे) ,एम.सी.ई. सोसायटीचे सचिव इरफान शेख  हे उपस्थित होते. शमारोषन (मेणबत्ती प्रज्वलन) करून मुशायरास सुरुवात झाली. डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त श्रीमती आबेदा इनामदार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरणदेखील या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक एकता व समता यांचे संदेश, रोमॅंटिक शायरी, अशा विविध शायरांनी वैविध्यपूर्णरित्या आपल्या शायरीतून दिले.त्यास प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.

अधिक वाचा  महिलांच्या कल्पक पेंटिंगने बालगंधर्व कलादालन सजले

यावेळी बोलताना अॅड. अभय छाजेड म्हणाले, माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी 35 वर्षांपूर्वी पुणे फेस्टिवलला सुरुवात केली. संपूर्ण देशात अशा प्रकारचा हा एकमेव फेस्टिवल झाला आणि त्यामुळे त्याला ‘मदर ऑफ फेस्टिवल’ म्हटले गेले. या फेस्टिवलमध्ये अखिल भारतीय मुशायराचे आयोजन केले जात असून तो एक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे

आबेदा इनामदार, म्हणाल्या, पुणे फेस्टिवलची सुरुवात माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी केली. त्यांनी सुरू केलेल्या या मिशनला आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. संपूर्ण जगाला माणुसकीचा,एकतेचा संदेश आपण अखिल भारतीय मुशायरा’ या कार्यक्रमातून जगाला देत असतो. आणि मला पूर्ण विश्वास  आहे की यामध्ये आपण यशस्वी होऊ.

मुशायरात डॉ. मंजर भोपाली (भोपाळ), डॉ. लता हया (मुंबई), अंजुम बाराबंकवी (लखनौ), अबरार काशिफ (अकोला), सरदार सलीम (हैदराबाद), सागर त्रिपाठी (वाराणसी), डॉ. कासिम इमाम (मुंबई) फरहान दिल (मालेगाव) अब्दुल हमीद हुनर आणि शाहनवाज काजी सईल, अब्दुल हमीद इनामदार, तन्वीर सोलापुरी हे सहभागी झाले होते. डॉ. कासिम इमाम यांनी सूत्रसंचालन केले.

अधिक वाचा  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दाबण्यासाठी पूजाच्या आई-वडिलांना मिळाले 5 कोटी रुपये: पूजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

मालेगावहून आलेल्या फरहान दिल यांनी सादर केलेल्या

          सौ जख्म लगे है तो संभल क्यू नही जाता, इस दिलसे मोहब्बत का खल्ल क्यू नही जाता

          दिल लेके भटकता हू मै बाजारे वफा मे, ये इष्क सिक्का है तो, चल क्यू नही जाता..

या गझलला आणि

शाहनवाज काजी सईल यांनी सादर केलेल्या

                मुझे तुम भूल जाने मे जरासी देर तो करते

                नया रिश्ता बनाने मे जरासी देर तो करते

                मुझे फिर इष्क करना था, मुझे फिर दिल लगाना था.

                मुझे तुम याद आने मे जरा से देर तो करते…

                जरासी देर हो जाती तुम्हे पलके झुकाने मे, या फिर पलके उठाने मे , जरासी देर तो करते

अधिक वाचा  गायक रविराज नासेरी यांच्या भजन,अभंग,सूफी गाणी आणि गझल गायनाने रसिक तृप्त

                मोहब्बत नही सौदे की गुंजाईश मगर जाना, वफा को बेच आने मे जरासी देर तो करते….

               या गझलला रसिकांनी भरभरून दाद दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love