राष्ट्रीय फिन स्विमिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या इव्हा मालवणकर व निया पतंगेने पटकाविले कांस्यपदक

राष्ट्रीय फिन स्विमिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या इव्हा मालवणकर व निया पतंगेने पटकाविले कांस्यपदक
राष्ट्रीय फिन स्विमिंग स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या इव्हा मालवणकर व निया पतंगेने पटकाविले कांस्यपदक

पुणे-  महाराष्ट्रातील फिन स्विमर्स यांनी राजस्थानच्या उदयपूर येथील खेळगांवमध्ये आयोजित ‘राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅपियनशिप’मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूलच्या ६ वीं तील इव्हा मालवणकर आणि ८ वी तील निया पतंगे यांनी कांस्यपदक पटकावून आपली प्रतिभा दाखविली आहे.

राष्ट्रीय स्तरावर आयोजित या स्पर्धेत वेस्ट बंगाल, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र आणि राजस्थान येथील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये वैयक्तिक ११ आणि १४ वर्षाखालील मुलींच्या ५० मी. मोनोफिन व २०० मी. बायोफिन या प्रकारात ध्रुव ग्लोबल स्कुलमधील ६ वी तील इव्हा मालवणकर आणि २०० मी. बायोफिन प्रकारात ८ व्या वर्गातील निया पतंगे ने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून पदकावर आपले नाव कोरले. त्यांनी स्नोर्कल आणि फिन्स वापरून अतिशय अवघड अशा प्रकारात उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकलीत. यांच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक संजय मालपाणी, शाळेचे विश्वस्त यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी कौतुक केले.

अधिक वाचा  #Pune Public Policy Festival : शहरी शाश्वतता, ऊर्जा शाश्वतता यांचा किफायतशीर पद्धतीने मिलाफ घडवण्याचा प्रयत्न- हरदीपसिंग पुरी

यावेळी संजय मालपाणी यांनी विद्यार्थ्यांना पुणेरी पगडी, शाल, ध्रुव स्टार आणि ट्राफी देऊन गौरव केला. तसेच विद्यार्थ्यांना खेळ, खेळाचे महत्व, आहार, शारीरिक, मानसिक विकास यावर मार्गदर्शन केले.

या दोघींना प्रशिक्षक स्मिता काटवे, उमा जोशी, केशव हजारे, तसेच रूपाली अनाप यांनी मार्गदर्शन केले. यापूर्वी ह्या दोघींनी अनेक राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love