Film is my career, dance is my craft and politics is my service.

फिल्म माझे करिअर,नृत्य माझी साधना आणि पॉलीटिक्स माझी सेवा आहे- हेमा मालिनी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–फिल्म माझे करिअर आहे , नृत्य माझी साधना आहे आणि पॉलीटिक्स माझी सेवा आहे. असे भावपूर्ण उद्गार अभिनेत्री, नृत्यांगना व पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन खा. हेमा मालिनी (Hema Malini) यांनी काढले. ३५ व्या पुणे फेस्टिव्हल (Pune Festival) अंतर्गत महिला महोत्सवाचे बालगंधर्व कलादालन येथे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. (Film is my career, dance is my craft and politics is my service.)

पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल (KrushnakumarGoyal) , मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड (Abhay Chajed) , पदाधिकारी कश्यपसिंह चुडासमा, बाळासाहेब अमराळे, अतुल गोंजारी, मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे व चित्रकार महिला या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘राधे राधे आज राधाष्ट्मी आहे आणि आज महिला महोत्सवाचे उद्घाटन देखील आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. मी मथुरावरून येत आहे. आजचा दिवस खूप शुभ आहे. याठिकाणी येऊन मला खूप आनंद होत आहे. आय लव्ह पुणे, आय लव्ह पुणेकर अस सांगून त्या म्हणाल्या की, गेली २० वर्षे मी राजकारणात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयक आणल त्यामुळे महिलांना ३३% आरक्षण राजकीय आरक्षण मिळणार आहे. हे फार महत्वाचे आहे.

त्या पुढे म्हणाल्या की , या पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनात अनेक आर्टिस्टने येऊन माझी पेंटिंग बनवली. पण, आज ‘ड्रीम गर्ल’ वर पूर्ण सब्जेक्ट बनविण्यात आला. याबद्दल आभार व्यक्त करून त्या म्हणाल्या की, आपण माझ्याबद्दल या प्रदर्शनातून व्यक्त केलेल्या भावनांमुळे मी भारावून गेले आहे.  यापुढे त्या म्हणाल्या की, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी तब्बल ३५ वर्ष देशातील हा संस्कृती महोत्सव चालू ठवला याबद्दल यांचे अभिनंदन केले पाहिजे. संपूर्ण देशातील कलाकार इथे येऊन आपली कला सादर करतात. या मंचावर आपली कला सादर करणारे उगवते व नवोदित कलाकार या देशात चमकत आहेत ही कौतुकाची बाबा आहे.  पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला महोत्सव सुरु केला. त्यामुळे, पुण्यातील हजारो महिलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. ही आनंदाची बाब आहे. या महिला महोत्सवात विविध स्पर्धांच्या संयोजकांचे देखील त्यांनी कौतुक केले.

पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिला महोत्सवतील ब्रायडल मेक अप स्पर्धेच्या संयोजिका दिपाली पांढरे यांनी स्वागत केले, पाककला स्पर्धेच्या संयोजिका करुणा पाटील यांनी प्रस्तावना केली, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजिका सुप्रिया ताम्हाणे यांनी आभार मानले. नीरजा धिरेन्द्र यांनी सूत्रसंचालन केले. तसेच, मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेच्या संयोजक अमृता जगधने आणि महिला नृत्य स्पर्धेच्या संयोजक संयोगिता कुदळे यांनी हेमाजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महिला महोत्सवातील पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनाच्या संयोजक अॅड. अनुराधा भारती यांनी हेमा मालिनी यांना हँडपेंटेड साडी व पंजाबी दुपट्टा भेट दिला. याप्रसंगी, वर्षा कुलकर्णी, सहयोगी संपादक सकाळ, तनिष्का व्यासपीठ, माधुरी घुले आणि अनुराधा हटकर समन्वयक कस्तुरी क्लब पुढारी, मेघना पालकर समन्वयक संस्कृती क्लब पुण्यनगरी आणि डॉ. अंजली जोशी मिडास टच इन्स्टिट्यूट यांचा हेमा मालिनी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *