महाडीबीटी पोर्टल – कृषि योजनांसाठी लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतक-यांनी पुढील कार्यवाही कशी करावी:वाचा संपूर्ण माहिती


पुणे-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. सदर सुविधा कार्यान्वित केल्याचे सन २०२०-२१हे पहिले वर्ष आहे. कृषि विभागाने वरील पोर्टल वर अर्ज करण्यासाठी दि.११/०१/२०२१ ही अंतिम तारीख घोषित केली होती. त्यानुसार दि.११/०१/२०२१ अखेर प्राप्त सर्व अर्जासाठी लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने कृषि यांत्रिकीकरण, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी नवीन विहीर, कांदाचाळ, प्लॅस्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचा समावेश आहे. निवड झालेल्या शेतकरी बंधूंना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर लघुसंदेश देण्यात आले आहे. निवड झाल्याचा संदेश ज्या शेतकर्‍यांना/लाभार्थिंना प्राप्त झाला आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

अधिक वाचा  ‘महाराष्ट्र केसरी‘ स्पर्धेचा थरार वर्षाखेरीस डिसेंबरमध्ये पुण्यातील कोथरूडमध्ये रंगणार

वरील कागदपत्रांच्या छाननीनंतर पुढे करावयाच्या कार्यवाही बाबत लाभार्थिंना वेळोवेळी सूचना प्राप्त होतील. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ई-मेल वर किंवा ०२०-२५५११४७९  या दूरध्वनी क्रमांकावर  संपर्क साधावा असे आवाहन कृषि आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love