gtag('js', new Date());
म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर पर्यंतच्या नवीन पुलाचे लोकार्पण
संगमनेर - संगमनेर शहरातील साईनगर येथील म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री संतोषी माता मंदिर पर्यंतच्या नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नागरिकांनी पुलावरून फेरफटका मारत आपला आनंद व्यक्त केला.या आधीचा पूल निकृष्ट बांधकामामुळे कोसळल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नदी पार करण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालावा लागत होता, मात्र...
#Pune Bridge Collapse : कुंडमळा येथील इंदायणीवरील लोखंडी पूल का कोसळला? : कारण आले समोर
पुणे (प्रतिनिधी)-- पुणे जिल्हय़ातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी रविवारचा दिवस घातवार ठरला. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरातील कुंडमळा येथील इंदायणीवरील लोखंडी पूल क्षमतेपेक्षा अधिक भाराने कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला व १८ जण गंभीर जखमी झाले. तर ३८ जणांना वाचवण्यात (NDRF) च्या पथकाला यश आले. या आपत्तीत अनेक जण नदीच्या प्रवाहासोबत वाहून...
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
मुंबई दि. 15 :- पुणे जिल्ह्यातील  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक,...
मावळमध्ये कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला
पुणे (प्रतिनिधि)--पुण्याच्या मावळ तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल रविवार, १५ जून २०२५ रोजी कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे. यातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 5 जखमींना रुग्णालयात...
अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीच्या इरफान शेखचा मृत्यू
पुणे(प्रतिनिधि)-- "आई, मी फ्लाइटवर जातोय... काळजी करू नकोस" तुझ्या तब्येतीची काळजी घे. मी पुन्हा फोन करतो... पिंपरीतील इरफान शेखचा आणि त्याच्या आईचा हा नेहमीचा संवाद. मात्र हा संवाद यावेळी अखेरचा ठरला. पिंपरीच्या संत तुकाराम नगर परिसरातील रहिवासी इरफान शेख (वय २२) गेल्या दोन वर्षांपासून विमान कंपनीत केबिन क्रू म्हणून कार्यरत होता. कामाचा एक भाग म्हणून...
उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ
पुणे (प्रतिनिधि)--उद्धव ठाकरे यांनी  भेटायला बोलावल्यास आपण त्यांना भेटायला नक्कीच जाऊ, असे मोठे विधान सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केले. मात्र, या भेटीचा अर्थ राजकीय दृष्ट्या काढू नये, असे स्पष्टीकरणही त्यांनी लगेच दिले. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत, संजय शिरसाट यांनी...