gtag('js', new Date());
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८३ पेक्षा अधिक जागा मिळतील
पुणे, ता. ९ : "सध्याचे सरकार लिलावी पद्धतीचे असून, ठेकेदारी आणि कंत्राटी यंत्रणेने ग्रासलेले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून, लोक उपचारांअभावी तडफडून मरताहेत. सरकार मात्र, खुर्ची बचाव योजना राबवत असून, निवडणुकीच्या दृष्टीने लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आणत आहे. हा केवळ निवडणुकीचा फार्स आहे. जनता या सगळ्या गोष्टीना वैतागली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८३ पेक्षा अधिक...
Sharad Pawar and Vinod Tawde will come on the same platform
पुणे(प्रतिनिधि)--मराठी साहित्यिक प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्यावरील “अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर" या चरित्र ग्रंथाचा इंग्रजी व हिंदी अनुवाद असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे व साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत होणार आहे.येत्या १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११. ३० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे हा...
कुख्यात गुंडाचा डोक्यात दगड घालून खून
पुणे(प्रतिनिधि)- कुख्यात गुंड राजू शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) याचा मध्यरात्री किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालून खून केला आहे. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे दीडच्या सुमारास हडपसर मधील राम टेकडी येथील वंदे मातरम चौकात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.या खून प्रकरणी राजू शिवशरणचा भाचा निखिल कैलास चव्हाण, (रा. वंदे मातरम चौक...
जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख थोडक्यात बचावले
पुणे(प्रतिनिधि)--राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचा शिवनेरी येथून प्रारंभ झाला. दरम्यान, किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. मात्र, सुदैवाने ट्रॉलीमध्ये असणारे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख हे थोडक्यात बचावले. अमोल...
विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण स्टार्टअप्सकडे वळायला हवे
पुणे- पूर्वी विद्यार्थ्यांना दर्जेदार व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीन विकास करणारे शिक्षण घेण्यासाठी पाश्चिमात्य देशांची वाट धरावी लागत असे. परंतू आता, भारतातील शैक्षणिक क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बहरत आहे. काहीवर्षांपूर्वी भारतात केवळ ४५८ अँक्टिव्ह नाविण्यपूर्ण स्टार्टअप्स होती, त्यांची संख्या आता दीड लाखांच्या पार गेली आहे. विशेष म्हणजे यातील ९० स्टार्टअप्स ही युवकांच्या पुढाकारातून आलेली आहेत. त्यामुळे, भारतासमोरील बेरोजगारीची समस्या सोडवायची...
स्क्रिपबॉक्सची थेट म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी आधारित सल्ला सेवा सुरू
पुणे- भारतातील अग्रगण्य म्युच्युअल फंड ॲप असलेल्या स्क्रिपबॉक्सने आज थेट म्युच्युअल  फंडांसाठी गुंतवणूक सल्ला सेवा सुरू करण्याची घोषणा केली. आतापर्यंत ही सेवा हाय नेट वर्थ (एचएनआय) असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध होती, मात्र आता ती स्क्रिपबॉक्स ॲपच्या माध्यमातून मासिक शुल्क देणाऱ्या सर्व ग्राहकांना उपलब्ध होणार आहे."थेट म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारांना तज्ञांचा सल्ला सहज मिळत नाही. बाजारपेठेत ही एक मोठी उणीव आहे आणि...