पुणे(प्रतिनिधि)– पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इन्स्टिट्यूट प्रस्तुत महाराष्ट्र ज्यूदो संघटने तर्फे आयोजित राष्ट्रीय कॅडेट स्पर्धेत हरयाणा संघाने ४ सुवर्णपदक आणि ५ कांस्यपदक मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले तर, मणिपुर संघाने ४ सुवर्णपदक आणि १ कांस्यपदक मिळवून उपविजेतेपदक मिळवले. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील श्रावणी डिके हिने ५७ किलोखाली गटात रौप्यपदक तर, ठाणेच्या इरा माकोडे हिने रौप्यपदक मिळवले.
बालेवाडी-म्हाळूंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे आज झालेल्या कॅडेट गटामध्ये ७० किलोखालील गटामध्ये ठाणेच्या इरा माकोडे हिने रौप्यपदक मिळवले. इरा ही मंगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबीवली येथील सेव्हन फायटर्स क्लब येथे सराव करते. या गटात मणिपुरच्या युमनाम बिलीलीया हिने सुवर्णपदक मिळवले. यवतमाळ जिल्ह्यातील श्रावणी डिके हिने ५७ किलोखाली गटात रौप्यपदक संपादन केले. श्रावणी दिग्रस तालुकामध्ये रवि भुषण कदम यांच्याकडे सराव करते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण कुस्ती प्रशिक्षक आणि अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव श्री. शैलेश टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले आणि तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव श्री. शैलेश टिळक यांनी तर, सर्वांचे आभार तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे यांनी मानले. सर्व विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक तर, पदक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम आणि मेडल्स् देण्यात आली. ५२ किलोखालील गटातील छत्तीसगढ राज्याच्या रंजीथा करोटे हिला स्पर्धेचे उत्कृष्ट महिला ज्युदोपटू या श्रेणतील स्वर्गीय आमदार सौ. मुक्ता शैलेश टिळक स्मृतीप्रित्यर्थ ठेवण्यात आलेला चषक प्रदान करण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकालः कॅडेट गटः मुली विभागः
५७ किलोखालील गटः
सुवर्णपदकः लगन लक्शाकर, उत्तरप्रदेश;
रौप्यपदकः श्रावणी डिके, महाराष्ट्र;
कांस्यपदकः दर्जदा खुशबू, गुजरात;
कांस्यपदकः सिष्टी, हरयाणा;
६३ किलोखालील गटः
सुवर्णपदकः मोनिका केएच, मणिपुर;
रौप्यपदकः बरनोश्री कोले, पश्चिमबंगाल;
कांस्यपदकः जेश्ना अहुजा, पंजाब;
कांस्यपदकः लवनीत मलिक, हरयाणा;
७० किलोखालील गटः
सुवर्णपदकः युमनाम बिलीलीया, मणिपुर;
रौप्यपदकः इरा माकोडे, महाराष्ट्र;
कांस्यपदकः दिक्शा , हरयाणा,
कांस्यपदकः सोनाक्शी पंडीत, राजस्थान;
७० किलोवरील गटः
सुवर्णपदकः राधिका, हरयाणा;
रौप्यपदकः शानसा सरकार, पश्चिमबंगाल;
कांस्यपदकः हरपुनित कौर, पंजाब;
कांस्यपदकः हिपांशी पनवर, हरयाणा;
कॅडेट गटः मुले विभागः
६० किलोखालील गटः
सुवर्णपदकः तिटुन ताबा, अरूणाचलप्रदेश;
रौप्यपदकः नितीन बलहारा, दिल्ली;
कांस्यपदकः कपिल दमाई, छत्तीसगढ;
कांस्यपदकः युमनाम योहेनबा, मणिपुर;
७३ किलोखालील गटः
सुवर्णपदकः हर्षित, हरयाणा;
रौप्यपदकः करणवीरसिंग मान, पंजाब;
कांस्यपदकः हर्षवर्धन पंजाब;
कांस्यपदकः प्रिन्स्, उत्तरप्रदेश;
८१ किलोखालील गटः
सुवर्णपदकः भाव्य सिंग, हरयाणा;
रौप्यपदकः अश्विन भारव्दाज, राजस्थान;
कांस्यपदकः पार्थ धानिया, दिल्ली;
कांस्यपदकः मित पारखे, गुजरात;
९० किलोखालील गटः
सुवर्णपदकः राम कुमार, पंजाब;
रौप्यपदकः कार्तिक भारव्दाज, दिल्ली;
कांस्यपदकः रोहीत पांघल, हरयाणा;
कांस्यपदकः मनमोहन सिंग, राजस्थान;
९० किलोवरील गटः
सुवर्णपदकः बाबनुर सिंग, राजस्थान;
रौप्यपदकः भविष्य, दिल्ली;
कांस्यपदकः पुशय मित्तर, पंजाब;
कांस्यपदकः अक्क्षज पिल्ले, महाराष्ट्र;