ग्रामपंचायत निवडणूक: जात वैधता प्रमाणपत्रासाठी हस्तलिखित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.


पुणे –राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यात पुणे जिल्हयातील 748 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

याव्दारे उपरोक्त ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक  लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांस आवाहन करण्यात येत की, दि.1 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.maharashtra.gov.in या वेबपोर्टलवर परिपूर्ण भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमिट करावेत. तदनंतर त्याची प्रिंट घेऊन पूर्वीप्रमाणेच विहित कार्यपध्दतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत समिती कार्यालयाकडे प्रत्यक्ष सादर करावेत. जुन्या पध्दतीने हस्तलिखित स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत. याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त नितीन ढगे यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  आदिवासी विद्यार्थी शासकीय वसतीगृहामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याने अभाविपचे आंदोलन