तर पुण्याचा पालकमंत्री बदलवला पाहिजे – चंद्रकांत पाटील


पुणे— पुणे शहरातल्या अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे ही परिस्थिती सुधारवायची असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातच बसल पाहिजे आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना जर मुंबईत बसायचे असेल तर पुण्याचा पालकमंत्री बदलवला पाहिजे असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, राज्यात रेमडीसीवर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन यांची कमतरता आहे त्यावर सरकार काही करत नाही आणि लॉक डाऊन केले जाते आहेत त्याने काय फरक पडेल असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

बुधवारी पुण्यातल्या मॉर्डन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गरजूंना अन्नाची पाकिटे वाटप देण्यात आले यावेळी पाटील यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते.

अधिक वाचा  मराठा आरक्षणावरून दोन समाजामध्ये दरी वाढवण्याचे काम सुरू - उदय सामंत

पाटील म्हणाले, राज्यातल्या सर्व जिल्ह्यात तिथले पालकमंत्री उपस्थित आहेत की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी पाहिले पाहिजे, मात्र नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ 3600 मतदार असलेल्या गोकुळ दुधसंघाच्या निवडणुकीत बोंबलत बसले आहेत अशी  टीकाही पाटील यांनी केली. नगरजिल्ह्यात सर्वात वाईट परिस्थिती आहे. 30-35 रुग्ण दगावत आहेत . असे असताना पालकमंत्री लोकांना उपलब्ध होत नाहीत. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी छडी घेऊन बसलं पाहिजे. पालकमंत्री घाबरून लोकांना उपलब्ध हॉट नाहीयेत असा आरोप करून पाटील म्हणाले, त्या -त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात आहेत की नाही यावर मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओद्वारे लक्ष ठेवले पाहिजे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने घेतलेल्या लसीबाबत आपल्याला काही माहीत नाही मात्र हे सरकार कोरोना, वाजे प्रकरण,अनिल देशमुख प्रकरणावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे यासाठी आशा गोष्टीवर जास्त भर देत आहे, त्यांच्यावर कारवाई करायची ती करा पण दिवसभर तोच मुद्दा घेऊन टीव्ही समोर बसू नका, त्यापेक्षा रेमडेसिवीर कधी मिळणार, लस कधी मिळणार हे लोकांना सांगा. लोकांना आता आधाराची गरज आहे असेही पाटील म्हणाले.

अधिक वाचा  शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तरच देश सामर्थ्यवान होईल - अनिल घनवट

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणे हे जरी बरोबर असले तरी  त्यानंतर जनतेचे होणारे हाल रोखण्यासाठी राज्य सरकारने काय केले आहे. राज्यात रेमडीसीवर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन यांची कमतरता आहे त्यावर सरकार काही करत नाही आणि लॉक डाऊन केले जाते आहेत त्याने काय फरक पडेल असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love