भारतात सर्वत्र गोविज्ञानाला वाढता प्रतिसाद – राज्यपाल कोश्यारी


पुणे – भारतात गोविज्ञानाचे नवे युग सुरू होत आहे, त्याला देशातील सर्व भागातून प्रतिसादही मिळत आहे, असे विचार महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी गोविज्ञान संशोधन संस्थेने काढलेल्या ‘दिनदर्शिका शके 1944’वर बोलताना काढले. गोविज्ञान संशोधन संस्था आणि गोसेवा विभाग यांच्या वतीने ही दिनदर्शिका राजभवनावर राज्यपालांना सादर करण्यात आली. त्या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देशांतील अनेक सरकारांनी आणि राज्यपालांनीही हा विषय त्यांच्या प्रमुख भाग केलेला आहे. गोविज्ञान हे आपलेच सनातन शास्त्र आहे पण दीर्घकाळ त्याकडे दुर्लक्ष झाले होते. आताही संशोधनातून जे मुद्दे पुढे येत आहेत, ते देशाला अतिशय उपयोगी ठरणारे आहेत.

या प्रसंगी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची गोविज्ञानाबाबतची प्रयोगशीलता सांगताना गोविज्ञानचे कार्यकर्ते श्री मोरेश्र्वर जोशी म्हणाले, गेल्या साठ-सत्तर वर्षातील शेतकर्‍यांची रासायनिक खताबाबतची सवय जाणे कठीण असते पण एकदा शेतकर्‍यांना गोविज्ञानाच्या सामर्थ्याची प्रचीती आली की, शेतकरीच नवे नवे प्रयोग करू लागतात. दहा किलो शेणात थोडे तूप आणि थोडा मध घालून आम्ही ‘अमृतपाणी’ तयार करतो. त्यातून एका एकराची शेती होते. अन्यथा त्या शेतीसाठी एकराला पंचवीस ते पस्तीस हजार रुपयांचे खत लागते. महाराष्ट्राचा गोसेवा विभाग प्रत्येक गावापर्यंत पोहोचला असून तेथे शेतकर्‍यांची छोटी छोटी मंडळेही स्थापन झाली आहेत. या प्रसंगी गोसेवा विभागाचे श्री रवी रबडे यांनी ‘महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी सुरू केलेल्या गोआधारित शेती स्पर्धेची माहिती दिली तर गोविज्ञान संशोधन संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी लुंकड यांनी संस्थेचा गोवैद्यक दवाखाना व आरोग्य शिबिरे यांची माहिती दिली.

अधिक वाचा  विद्यार्थ्यांनी सदाचाराचे व्रत अंगिकारताना जीवन मूल्यांसह जगातील आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात करावे- राज्यपाल कोश्यारी

संस्थेचे सचीव श्री बापूराव कुलकर्णी यांनी या सार्‍या कामामार्गे श्रद्धेय मोरोपंत पिंगळे यांची प्रेरणा असल्याचे सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love