ऑटीझम डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पदवीदान प्रदान समारंभ

Graduation ceremony for students completing Autism Diploma course
Graduation ceremony for students completing Autism Diploma course

पुणे : “स्वमग्नता ही लहान मुलांमधील समस्या जगभरात वेगाने वाढतेय. जगातील समस्याग्रस्त मुलांचे प्रमाण ६८ मध्ये १ तर हेच प्रमाण भारतात १०० मागे एक मूल असे आहे. अशा मुलांना हाताळणे, योग्य उपचार करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याकडे नाही. ते तयार होण्याची नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन वैदेही दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट स्वमग्नता प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. सुनील गोडबोले यांनी केले.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील स्मॉल स्टेप सेंटर, सुंदरजी ग्लोबल अॅकॅडमीया स्कूल यांनी एकत्र येऊन भारतातील पाहिले वैदेही दत्ताजी गायकवाड इन्स्टिट्यूट स्वमग्नता प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातर्फे पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ऑटीझम आणि सर्टिफाईड फाउंडेशन कोर्स इन ऑटीझम हे अभ्यासक्रम २०२३ पासून सुरू केले आहेत. त्यातील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पहिल्या वर्गातील  ५० प्रशिक्षणार्थीचा  दीक्षांत  समारंभ कार्यक्रम रविवारी ( ता. ७) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे झाला. यावेळी प्रसिद्ध नृत्य गुरू मनीषा साठे, प्रख्यात बांधकाम व्यावसायिक दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड, कोर्सचे संचालक डॉ. सुनील गोडबोले, शिक्षण तज्ज्ञ मसरत तवावाला यांची प्रमुख उपस्थिती होती. या कोर्सला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता प्राप्त आहे. 

अधिक वाचा  विकासक्षम नागरिकांमुळेच राष्ट्राची प्रगती : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

डॉ. गोडबोले म्हणाले,”  स्वमग्नता आजाराची लक्षणे म्हणजे मुलांमधील सामाजिक संवादाचा अभाव, वारंवार एकसुरी संवाद, नजरानजर टाळणे, सूचनांचे पालन न करणे, संवादच करता न येणे. उदाहरण म्हणजे या समस्येने ग्रस्त मुले समाजात मिसळत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर औषधच उपलब्ध नाही. केवळ समस्येची तीव्रता कमी करण्याची औषधे आहेत. त्याच्या थेरपीज आहेत. यात पालकांची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. मात्र त्यांच्यात जाणीव नाही. प्रशिक्षित लोक नाहीत. हे लोक तयार करण्याची गरज आहे. यासाठीच स्वमग्नता प्रशिक्षण केंद्रातर्फे ७ महिन्याचा सर्टिफाईड कोर्स आणि १ वर्षाचा डिप्लोमा कोर्स सुरू केला आहे. यामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. निवडक प्रशिक्षणार्थींना शिष्यवृत्ती मिळते. पदवीधर व्यक्ती, शिक्षक, पालक, मानसशास्त्र तज्ञ हा कोर्स करू शकतात.”

अधिक वाचा  जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये होते आहे सुधारणा? काय केले बदल?

” या कोर्समध्ये ३० हून अधिक उच्चशिक्षित तज्ज्ञ अनुभवी शिक्षक फॅकल्टी म्हणून शिकवितात. कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे १० वर्षांचा अनुभव असलेले ठिकाण, भरपूर प्रशिक्षण, शॅडो टीचर, थेरपी सेंटरमध्ये काम, सहायक म्हणून काम, पालकांनी हा कोर्स केल्यास मुलांचा सांभाळ करण्यासाठी उपयुक्त आहे. या लोकांना या क्षेत्रात मोठा वाव आहे,” असेही डॉ. गोडबोले यांनी सांगितले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love