नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढल्याने देशाच्या राजधानीत सोन्याच्या भावात प्रती १० ग्रॅम (एक तोळा) ४१८ रुपयांनी वाढून तो ५२ हजार ९६३ रुपयांवर पोहचला. तर चांदीची मागणी वाढल्याने चांदीच्या किमतीत प्रतिकिलो २,२६६ रुपयांनी वाढ होऊन प्रतिकिलो ७२,७९३ रुपये इतके झाला.
अर्थ तज्ञाच्या माहितीनुसार सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किंमती वाढल्यामुळे दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याचा भाव ४१८ रुपयांनी वाढला आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ झाल्यामुळेही सोन्याच्या दारात वाढ झाली आहे.
दरम्यान, जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस १,९८८ डॉलर होता आणि चांदीच्या भाव किरकोळ वाढीसह २८.७७ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होता. डॉलरच्या घसरणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वधारला.
रुपया ७३ पैशांनी वधारला
देशांतर्गत शेअर बाजारात आलेली तेजी आणि अमेरिकी डॉलरच्या किमतीत झालेली घसरण झाल्यामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ७३ पैशांनी वधारला. विदेशी व्यापा-यांच्या म्हणण्यानुसार , भारतीय रिझर्व्ह बँकेने रोख व्यवहारावरील दबाव कमी करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. ज्यामुळे रुपया वधारला आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया प्रति डॉलर ७३.१८ वर उघडला. तथापि, व्यापारा दरम्यान रुपयाला वेग आला आणि अखेर ७३ पैशांच्या भक्कम वाढीसह प्रति डॉलर ७२.८७ वर स्थिर झाला. मागील व्यापार सत्रात रुपया प्रति डॉलर ७३.६० वर बंद झाला होता.