आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीची चोवीस तास मोफत सुसज्ज रिक्षा रुग्णवाहिका योजना


पुणेः-“कोव्हीड महासाथीत देशातील शासन आणि व्यवस्था कोलमडलेली असताना जनता ती सावरायला कशी उभी राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांची  चोवीस तास मोफत सुसज्ज रिक्षा रुग्णवाहिका योजना. रुग्णवाहीकांचा तुटवडा आणि उपलब्ध रुग्णवाहिकांनी सुरु केलेली मनमानी यांवर ही योजना हे एक खणखणीत उत्तर ठरत आहे.

हे सर्व रिक्षा चालक कोविड योद्धे आहेत. आरोग्य सेना त्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे,  असे उदगार आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉ.अभिजित वैद्य यांनी काढले. ते आरोग्य सेना आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या २४ तास मोफत १०२ सुसज्ज रिक्षा रुग्णवाहिका या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हा कार्यक्रम आरोग्य सेना राष्ट्रीय मुख्यालय, बाजीराव रस्ता,  पुणे येथे संपन्न झाला.

अधिक वाचा  माइण्‍ड वॉर्सच्‍या नॅशनल अकॅडेमिक चॅम्पियनशीपला भारतभरातून मिळाला सकारात्‍मक प्रतिसाद

या कार्यक्रमाला आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष श्री. बाबा कांबळे, पुणे शहर कार्याध्यक्ष शफिक पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, निरीक्षक कुमार शेट्ये, जावेद शेख, कादर शेख, मोहसीन शेख, हुसेन शेख उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना महाराष्ट रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष, कष्टकरी पंचायतीचे नेते बाबा कांबळे म्हणाले, ‘आरोग्य सेनेने आमच्या खांद्याला खांदा भिडवल्यामुळे आम्ही २६ एप्रिल रोजी सुरु केलेली ही अभिनव सेवा खूप मोठे स्वरूप घेवू शकली आहे. जनतेची गरज ओळखून आम्ही ती ३१ मे पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासन जे करू शकत नाही ते आमच्या या रिक्षा चालक योद्धांनी करून दाखविले आहे. या सर्वांना आरोग्य सेनेने या संपूर्ण कालावधीसाठी इंधन खर्च, त्याचबरोबर पी.पी.ई.किट्स आणि रिक्षा सॅनिटाझेशन स्प्रे दिल्याने हे शक्य झाले आहे.”

अधिक वाचा  नव्या शैक्षणिक धोरणानुरूप शिक्षकांनी मानसिकता बदलावी- ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख

भोगीलाल आणि कंपनी चे संचालक अतुल शहा यांनी या उपक्रमासाठी २ लाख रुपये किंमतीची वॉशेबल पी.पी.ई. किट्स आरोग्य सेनेला देणगी दाखल दिली. या प्रसंगी डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते काही रिक्षा रुग्णवाहिका चालकांना इंधन मानधन आणि पी.पी.ई. किट्स देण्यात आली.

गरजू रुग्णांनी या सेवेसाठी ९८५०४९४१८९ व ७८४१०००५९८ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love