पुणे: जीवनात ग्लॅमर आणि आरोग्य यांच्यातील समतोल राखण्याच्या महत्त्वाबद्दल समाज जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रोलक्स वेलनेस अँड प्रॉडक्शन ने प्रोलक्स गाला: द ग्लॅमोवेल एक्स्ट्रावागांझाची या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हा संपूर्ण कार्यक्रम ९ ते २५ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. अशी माहिती प्रोलक्स प्रोडक्शनच्या संस्थापक संचालिका आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स डॉ.प्रचिती पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. प्रचिती पुंडे यांनी सांगितले की, प्रोलक्स ही एक जीवनशैली असून एक बहु-अनुभव केंद्र जे जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे ते प्रदान करते. या कार्यक्रमा अंतर्गत ग्लॅमवेल वेलनेस अवेअरनेस रॅली काढण्यात येणार आहे. सहा दिवस चालणार्या हा कार्यक्रम ९ ते १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी असेल. १६-१८ ऑगस्ट रोजी प्रोलक्स प्रॉडक्शन डे साजरा करण्यात येईल. संध्याकाळी ६-८ या दरम्यान ग्लॅमोवेल रॅली आणि टिकाऊ पोशाखांसह फॅशन रॅप शो समाविष्ट आहे. तसेच २३ ते २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत प्रोलक्स वेलनेस डे साजरा करण्यात येईल. यामध्ये वेलनेस वर्कशॉप्स, स्पा ट्रीटमेंट्स आणि इंटरएक्टिव्ह वेलनेस झोन घरात उपलब्ध असतील. ज्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा समावेश असेल.
आयोजित पत्रकार परिषदेला प्रोलक्स प्रॉडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष उन्नीथन आणि महाव्यवस्थापक जयंत यादव उपस्थित होते.
प्रोलक्स आणि ग्लॅमोवेल
सध्या आमच्याकडे ४ के डॉल्बी अॅटमॉस साउंडसह ३६० डिग्री मूव्ही थिएटर, फोटोबूथ, क्रोमा शूटिंगसह एक ग्लॅमर झोन आहे. येथे ग्लॅमोवेल स्पा सह ब्युटी झोन आहे ज्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आणि अरोमाथेरपिस्ट यांनी कॅलिब्रेट केलेले ५ ते ८ स्टेप सिग्नेचर स्पा तसेच लक्झरी इंटीरियरसह नेल आर्ट आणि सलून मेकओव्हर सेवा आहेत. त्याच प्रमाणे रिटेल झोन मध्ये १५ हून अधिक पुस्तके आणि मासिके, एक मोबाइल अॅप, ग्रीन टी, व्हिटॅमिन बी १२ पावडर आणि ५,००० ते रु. ५१,००० पर्यंतच्या प्रभावी वेलनेस कॉर्पोरेट गिफ्ट पॅकसह उपभोग्य उत्पादने ऑफर करतो. त्याच प्रमाणे वर्क लाईफ बॅलन्स आणि अध्यात्मिक उर्जा बरे करण्यासाठी ३ सेकंद ते ३० सेकंदाची साधी साधने प्रदान करतात.